Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार चर्चा;नगराध्यक्षपदासाठी ॲड. मंजुषा विशाल साखरे यांचे नाव आघाडीवर

धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार चर्चा! नगराध्यक्षपदासाठी ॲड. मंजुषा विशाल साखरे यांचे नाव आघाडीवर

0 7 6 4 8 6

धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार चर्चा!

नगराध्यक्षपदासाठी ॲड. मंजुषा विशाल साखरे यांचे नाव आघाडीवर

धाराशिव : प्रतिनिधी

आगामी धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) कडून नगराध्यक्ष पदासाठी ॲड.मंजुषा विशाल साखरे यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. जनसामान्यातील सुशिक्षित, सक्षम व लोकाभिमुख उमेदवार म्हणून त्यांच्याबाबतची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

धाराशिव शहर विकासाच्या मार्गावर जाणार की आरोप-प्रत्यारोपाच्या चक्रात अडकणार, असा प्रश्न सध्या नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सक्षम, सुजाण आणि पारदर्शक उमेदवार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीत मिळाले.

अलीकडेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकांसंदर्भातील आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल साखरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी पक्षाच्या वतीने ॲड. मंजुषा विशाल साखरे यांच्या उमेदवारीसाठी निवेदन सादर केले.

◾या वेळी बोलताना ॲड. विशाल साखरे म्हणाले,

“धाराशिव शहरात सुशिक्षित व विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. आज जनता गुत्तेदारी व राजकीय नाट्यापेक्षा ठोस विकासाला प्राधान्य देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा तिसरा सक्षम पर्याय म्हणून लोकांच्या मनात निर्माण होत आहे.” साखरे यांनी पुढे सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी योग्य वेळेत घेतलेले निर्णय हे शहर विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरतील. महायुतीबाबतचे निर्णय वरिष्ठ स्तरावर होतील, मात्र धाराशिवसाठी राष्ट्रवादीकडे समसमान संधी मिळाली पाहिजे,असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

 राज्याचे कृष्णी मंत्री दत्ता मामा भरणे

◾या बैठकीत कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला !

आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागा, जनतेपर्यंत पोहोचा, त्यांचे प्रश्न जाणून घ्या आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कामाला लागा.
बैठकीच्या शेवटी ॲड. विशाल साखरे यांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचा स्मृतिचिन्ह देऊन कृषिमंत्री भरणे यांचा सन्मान केला.धाराशिव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास आणि संघटनशक्ती दिवसेंदिवस दृढ होताना दिसत आहे. यामुळे आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची लढत अधिक चुरशीची होणार, हे निश्चित झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे