ब्रेकिंगमहाराष्ट्र
अकलूज दौऱ्यात रामदास आठवलेंचा कार्यकर्त्यांशी संवाद; जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीत भावनिक क्षण
अकलूज दौऱ्यात रामदास आठवलेंचा कार्यकर्त्यांशी संवाद; जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीत भावनिक क्षण

0
7
6
4
8
6
अकलूज दौऱ्यात रामदास आठवलेंचा कार्यकर्त्यांशी संवाद; जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीत भावनिक क्षण
अकलूज : रामदास आठवले यांच्या अकलूज दौऱ्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून ते सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी त्यांनी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांशी विविध सामाजिक, राजकीय व संघटनात्मक विषयांवर चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांवर सडेतोड भूमिका मांडत उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.

दौऱ्यादरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची ‘शिवरत्न’ बंगल्यावर सदिच्छा भेट घेत जुने राजकीय व सामाजिक आठवणींना उजाळा दिला. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

यानंतर आठवले यांनी पँथर चळवळीतील जुने सहकारी पी.एस. गायकवाड यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व उपचारासाठी आर्थिक मदत दिली. या भावनिक प्रसंगामुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष आपुलकीची भावना निर्माण झाली.

यावेळी राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे, नंदकुमार केंगार, ज्ञानदेव कांबळे पाटील, मिलिंद सरतापे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
7
6
4
8
6



