Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

विनोद ‘पिटू’ गंगणे यांना विविध संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा;राजकीय वैर असलं तरी मैत्री कायम – मधूकर शेळके

श्री अष्टभुजा मातेसमोर विजयाची शपथ घेत “२३ पैकी २३ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदावर विनोद ‘पिटू’ गंगणे यांना आठ हजार मतांच्या आघाडीने विजयी करू

0 7 6 4 9 7

विनोद ‘पिटू’ गंगणे यांना विविध संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा;राजकीय वैर असलं तरी मैत्री कायम – मधूकर शेळके

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूरातील राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आदेशाने विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्या नेतृत्वाखाली मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात केलेला प्रवेश २७ नोव्हेंबर रोजी समर्थकांच्या प्रचंड गर्दीत जल्लोषात संपन्न झाला. या प्रवेश सोहळ्यास विविध सामाजिक आणि राजकीय स्तरातील मान्यवरांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली.

 

राष्ट्रीय इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके, सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, तुळजाभवानी उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष व काँग्रेस नेते आनंद कोंडो, महावीर कल्ले, शशिकांत मुळे तसेच दिव्यांग संघटना आणि अनेक सामाजिक संस्थांनी विनोद ‘पिटू’ गंगणे यांना जाहीर पाठिंबा देत राजकीय वातावरणाला नवा कलाटणी दिली.

“राजकीय वैर राहू दे… पण मैत्री कायम ठेवलीच पाहिजे,” अशा थेट आणि मार्मिक शब्दांत मधुकर शेळके यांनी व्यक्त केलेले मत प्रवेश सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरले.या कार्यक्रमाला भाजपचे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटू गंगणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी काळे, तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

 

श्री अष्टभुजा मातेसमोर विजयाची शपथ घेत“२३ पैकी २३ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदावर विनोद ‘पिटू’ गंगणे यांना आठ हजार मतांच्या आघाडीने विजयी करू,” असा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

तुळजापूरच्या राजकीय समीकरणात हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून राष्ट्रीय इंटक काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला झालेली गळती ही चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे. आगामी निवडणुकीत या घडामोडी मोठे राजकीय बदल घडवतील, अशी जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे