Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तामलवाडी पोलिसांचे आणखी एक यश; जनावर चोरी प्रकरणी दोन सराईत आरोपी गजाआड

तामलवाडी पोलिसांचे आणखी एक यश; जनावर चोरी प्रकरणी दोन सराईत आरोपी गजाआड

0 7 6 5 0 5

तामलवाडी पोलिसांचे आणखी एक यश; जनावर चोरी प्रकरणी दोन सराईत आरोपी गजाआड

तुळजापूर : तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या जनावर चोरीच्या गुन्ह्यात तामलवाडी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन सराईत आरोपींना ताब्यात घेतले आहे.

तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणात सावरगाव (ता. तुळजापूर) येथील अजीम निजाम सय्यद व निलेश उर्फ विश्वनाथ नागनाथ तानवडे या दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत.पोलिस तपासात २८ नोव्हेंबर रोजी दहिवडी येथील आनंद घाटे यांच्या तीन म्हशी चोरी केल्याची कबुली आरोपींकडून मिळाली आहे. त्यापैकी एक म्हैस साळेगाव येथील व्यापारी हमीद कुरेशी यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.

उर्वरित जनावरांच्या शोधासाठी पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, आरोपी निलेश तानवडे याच्या मोबाईलची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये पिस्तूलचा फोटो आढळून आला. त्यावरून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, संबंधित वस्तू ही पिस्तूलसारखी दिसणारी इलेक्ट्रिक लाइटर असल्याचे निष्पन्न झाले. या लाइटरचा धाक दाखवून चोरी करत असल्याचा पोलिसांना संशय असून, त्या अनुषंगानेही पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफाकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे, पोहवा तोगे, काझी तसेच पोलीस अंमलदार सुरज नरवडे, गोपाळ सलगर, शेख व नितीन भोसले यांचा सहभाग होता. तामलवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे