Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

उत्कृष्ट वृत्तसंकलनाबद्दल पत्रकार अरुण सुर्वे यांचा विशेष सन्मान मोडनिंब येथील श्री वेताळ साहेब यात्रोत्सवात मान्यवरांच्या हस्ते गौरव

0 7 6 4 8 6

उत्कृष्ट वृत्तसंकलनाबद्दल पत्रकार अरुण सुर्वे यांचा विशेष सन्मान मोडनिंब येथील श्री वेताळ साहेब यात्रोत्सवात मान्यवरांच्या हस्ते गौरव

मोडनिंब : मोडनिंब शहराचे ग्रामदैवत श्री वेताळ साहेब यांच्या यात्रोत्सवानिमित्त साप्ताहिक जोमदारचे माढा तालुका प्रतिनिधी अरुण सुर्वे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यात्रोत्सवाचे उत्कृष्ट वृत्तसंकलन केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे यांच्या शुभहस्ते श्री वेताळ साहेब यांची प्रतिमा व श्रीफळ देऊन अरुण सुर्वे यांचा गौरव करण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून यात्रोत्सवाचे प्रभावी वृत्तांकन केल्यामुळे उपस्थितांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
यावेळी श्री वेताळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुरणगीड्डे, उपाध्यक्ष संभाजी लादे, सचिव विजय खेलबुडे, उपसरपंच अमित कोळी, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, माजी सरपंच सत्यनारायण गिड्डे, शिवाजी उर्फ बच्चू गोरे, ग्रामपंचायत माजी सदस्य उदय जाधव, नंदू लादे, दत्तात्रय सरताळे, शिवसेनेचे वैभव मोरे, फंटू माने यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.या सन्मानामुळे पत्रकार अरुण सुर्वे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे