Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

कळंब खरेदी-विक्री संघावर भाजपचे वर्चस्व

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पॅनलचा १३ जागांवर दणदणीत विजय

0 7 6 4 8 6

कळंब खरेदी-विक्री संघावर भाजपचे वर्चस्व

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पॅनलचा १३ जागांवर दणदणीत विजय

​कळंब : तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘आई येडेश्वरी विकास पॅनल’ने १५ पैकी १३ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत उबाठा शिवसेनेच्या ‘शेतकरी विकास परिवर्तन पॅनल’ला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले असून, त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे.

एकूण १,१८४ मतदारांपैकी ६७६ जणांनी आपला हक्क बजावला होता. शनिवारी सायंकाळी झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच भाजपच्या पॅनलने आघाडी घेतली होती. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या रणनीतीसमो उबाठाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलचा टिकाव लागला नाही. ​भाजपच्या आई येडेश्वरी पॅनलने १३ जागांवर विजय मिळविला तर
​उबाठा शिवसेना पक्ष पुरस्कृत परिवर्तन पॅनलला केवळ ०२ जागांवर विजय मिळाला. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवानंतर, या निकालाने उबाठा शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत विजयी मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला. या विजयामुळे कळंब तालुक्याच्या राजकारणावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपली पकड पुन्हा एकदा घट्ट केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे