Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात साजरा झालेला मा. रोहन देशमुख यांचा वाढदिवस — सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उत्सव

0 7 6 4 8 7

स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात साजरा झालेला मा. रोहन देशमुख यांचा वाढदिवस — सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उत्सव

धाराशिव : स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, धाराशिव येथे दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी लोकमंगल उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. रोहन देशमुख यांचा वाढदिवस आनंदात, उत्साहात व सामाजिक भावनेने साजरा करण्यात आला. साधेपणात आणि सेवाभावात रंगलेला हा वाढदिवस समृद्ध सामाजिक बांधिलकीचा उत्तम आदर्श ठरला.

स्वआधार मतिमंद मुलींच्या या बालगृहात सध्या जवळपास १२१ मतिमंद मुली राहतात. अनेक मुलींचा कोणताही कौटुंबिक आधार नसल्याने त्यांची सर्वांगिण काळजी, शिक्षण, मनोबल विकास आणि राहण्याची व्यवस्था येथे अत्यंत प्रेमाने करण्यात येते. या मुलींना कुटुंबवत्सल वातावरण मिळावे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा यासाठी संस्थेतील पदाधिकारी सातत्याने झटत आहेत.

या पार्श्वभूमीवर मा. रोहन देशमुख यांनी आपला वाढदिवस नेहमीप्रमाणे कोणतेही औपचारिक कार्यक्रम न करता सामाजिक कार्याला वाहिलेल्या जागेत साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलींसाठी विशेष भोजन, केक कापण्याचा कार्यक्रम तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुलींच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्यफुलांनी संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.

यावेळी लोकमंगल उद्योग समूहाचे चेअरमन पंडीतनाना लोमटे,जयसिंग देशमुख , लोकमंगल उद्योग समूहाचे संचालक सचिन आडगळे,नाना शितोळे, आशुतोष लबडे, राहुल साळवे, देवानंद कांबळे तसेच तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी आरि उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या मुलींशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले आणि बालगृहाच्या उपक्रमांचे कौतुक केले.

लोकमंगल उद्योग समूहाचे सामाजिक कार्यातील योगदान आजवर अनेक उपक्रमांतून दिसून आले आहे.“समाजातील वंचित घटकांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हीच खरी सेवा” असे मत मा. जयसिंग देशमुख व पंडीतनाना लोमटे यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी भविष्यातही बालगृहातील मुलींसाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली.

स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात साजरा झालेला हा वाढदिवस केवळ औपचारिकता नसून सामाजिक संवेदनशीलतेचा, माणुसकीचा आणि प्रेमाचा उत्सव ठरला. समाजातील अशा उपक्रमांमुळे दुर्बल घटकांना नवी आशा आणि प्रेरणा मिळते, यावर उपस्थितांनी भर दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे