Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

शहराच्या विकासासाठी दूरदृष्टी असलेल्या प्राध्यापिका-वकील मंजुषा साखरे नगराध्यक्षपदाच्या रेसमध्ये आघाडीवर!

धाराशिवच्या राजकारणात नवा चेहरा,नवे नेतृत्व-ॲड.साखरे यांचे नाव शहरभर गाजतंय!

0 7 6 5 0 5

ओबीसी महिला प्रवर्गातून धाराशिव नगराध्यक्षपदासाठी ॲड. मंजुषा विशाल साखरे यांचा मजबूत दावा!

धाराशिवच्याया राजकारणात नवा चेहरा,नवे नेतृत्व-ॲड.साखरे यांचे नाव शहरभर गाजतंय!

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव शहरात आगामी २०२६ च्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून ओबीसी महिला प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पदाची निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगरसेवक ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांच्या पत्नी, प्राध्यापक आणि विधीज्ञ सौ.ॲड.मंजुषा विशाल साखरे या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरु आहे.

शिक्षण, कायदा आणि सामाजिक क्षेत्र या तिन्ही क्षेत्रांत आपला ठसा उमटवलेल्या ॲड. मंजुषा साखरे यांचे शैक्षणिक पात्रता (M.Sc. Biotechnology, B.Ed, LLB, LLM) अशी आहे. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या व सध्या धाराशिव न्यायालयात वकील म्हणून कार्यरत करीत आहेत.

महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून शहरातील महिलांना व्यावसायिक,शैक्षणिक व सामाजिक स्तरावर पुढे आणण्यासाठी त्यांनी विविध ग्रुप स्थापन केले आहेत. कोविड काळात तब्बल ५ लाख रुपयांच्या किटचे वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

धाराशिव नगरपरिषदेच्या २०१०-११ च्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले ॲड. विशाल प्रभाकर साखरे हे देखील पाणीपुरवठा व बांधकाम सभापती या पदांवर कार्यरत राहिले आहेत. त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जिल्हा, शहर व विधानसभा स्तरावर कार्यकर्त्यांसह सक्रिय सहभाग घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.सुरेश दाजी बिराजदार,जिल्हाध्यक्ष मा. महेंद्र धुरगुडे,तसेच जिल्ह्यातील विविध पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली साखरे दाम्पत्याने सातत्याने पक्षवृद्धीसाठी काम केले आहे.

धाराशिव शहरातील सुशिक्षित, कायद्याचे ज्ञान असलेली आणि समाजमन जिंकणारी महिला म्हणून ॲड. मंजुषा विशाल साखरे या नगराध्यक्षपदासाठी सक्षम पर्याय ठरत असून त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षांतर्गत चांगली चर्चा सुरू आहे.

“आपल्या नेतृत्वाखाली समाजहितासाठी आणखी प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळावी, एवढीच आमची अपेक्षा आहे,” असे मत ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी व्यक्त केले.

5/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे