Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

आपसिंगा परिसरात शेतकऱ्यांच्या जिवाला धोका; महावितरणच्या तारा खाली लोमकळत

आपसिंगा परिसरात शेतकऱ्यांच्या जिवाला धोका; महावितरणच्या तारा खाली लोमकळत

0 7 6 4 8 6

तुळजापूर : तालुक्यातील अपसिंगा परिसरात ढेकरी रोडलगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात महावितरणच्या विद्युत तारा धोकादायकरीत्या खाली लोमकळत असल्याने मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. या मार्गावरून शेतकरी, मजूर तसेच वाहनांची नेहमीची वर्दळ असते. पिकांची कामे करताना किंवा जनावरे चारताना कधीही दुर्घटना घडू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही संबंधित लाईनमन, अभियंता तसेच महावितरण प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. वीजपुरवठ्याच्या तारा जमिनीच्या अगदी जवळ आल्याने पावसाळ्यात किंवा वादळी वाऱ्यात धोका अधिकच वाढूशकतो. एखादी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, छोट्या दुरुस्तीने हा प्रश्न तात्काळ सुटू शकतो. मात्र जबाबदार अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करूनही ठोस कारवाई करत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी महावितरणने तातडीने दखल घेऊन विद्युत तारा उंचावर नेणे किंवा सुरक्षितरीत्या दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे