ब्रेकिंगमहाराष्ट्र
सुनावणीची तारीख ठरली; मात्र प्रत्यक्ष सुनावणीच नाही – शेतकऱ्यांचा संताप तीव्र
सुनावणीची तारीख ठरली; मात्र प्रत्यक्ष सुनावणीच नाही – शेतकऱ्यांचा संताप तीव्र

0
7
6
4
8
6
सुनावणीची तारीख ठरली; मात्र प्रत्यक्ष सुनावणीच नाही – शेतकऱ्यांचा संताप तीव्र
तुळजापूर : तालुक्यातील गंधोरा येथील शेतजमिनीतून उच्च दाबाच्या विद्युत तारांचे काम सुरू असल्याच्या वादग्रस्त प्रकरणात प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तहसील कार्यालयात दि. १८ मार्च रोजी दुपारी सुनावणी ठेवण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात सुनावणीच झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.रुकमीणबाई निलापा राठोड व रेणुका राजेश राठोड यांनी सेरेन्टिका रेन्युवेबल्स इंडिया प्रा. लि. कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही पूर्वपरवानगी किंवा लेखी करार न करता त्यांच्या शेतीतून उच्च दाबाच्या वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.विशेष म्हणजे, सुनावणीसाठी शेतकरी वेळेवर उपस्थित होते; मात्र उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित कंपनीचे अधिकारी गैरहजर राहिले. परिणामी नियोजित सुनावणी पार पडलीच नाही. यामुळे “शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत प्रशासन गंभीर आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या या निष्क्रिय भूमिकेचा निषेध व्यक्त करत, तात्काळ सुनावणी घेऊन काम थांबविण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
7
6
4
8
6



