पूरग्रस्तांना पुण्यधाम आश्रम ट्रस्टतर्फे मदतीचा हात माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, माजी नगराध्यक्षा सौ.संयोगिता गाढवे यांच्या उपस्थितीत वाटप सोहळा संपन्न

तुळजापूर : औदुंबर जाधव
पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या मदतीसाठी पुण्यधाम आश्रम ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील आरसोली रोडवरील श्री रामेश्वर महादेव मंदिर येथे संसार उपयोगी साहित्य व बी-बियाणे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विकासरत्न संजय गाढवे व माजी नगराध्यक्षा सौ. संयोगिता गाढवे प्रमुख उपस्थित होते. सौ. संयोगिता गाढवे यांच्या हस्ते शहर व तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गरजू नागरिकांना संसारोपयोगी साहित्य तसेच शेतीसाठी आवश्यक बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी श्री रामेश्वर महादेव मंदिर समितीचे विश्वस्त ह.भ.प. श्री. अरुण शाळू महाराज, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक देशपांडे साहेब, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामकिसन गव्हाणे, माजी नगरसेविका मेहेराज बेगम सय्यद, पत्रकार नंदकुमार देशमुख, वसीम काजळेकर, अशोक नलावडे तसेच पुणे येथील मान्यवर नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन औदुंबर जाधव यांनी केले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुण्यधाम आश्रम ट्रस्टचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.