Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर शहरात भाजपला मोठी ताकद; जिजामाता नगर आणि अण्णाभाऊ साठे नगरातील शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

0 7 6 4 8 6

तुळजापूर शहरात भाजपला मोठी ताकद; जिजामाता नगर आणि अण्णाभाऊ साठे नगरातील शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शहराचा सर्वांगीण विकास भारतीय जनता पक्षच करू शकतो या विश्वासातून जिजामाता नगर तसेच अण्णाभाऊ साठे नगर येथील इतर पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे परिवर्तन घडवले आहे.

जिजामाता नगरमधून भरत इंगळे, अमर शेळके, बबलू पठाण, शरद शेळके, संतोष ठवरे, अतुल सावंत, रामदास सावंत, संतोष महाबोले, प्रमोद नागणे, विनायक महाडिक, अजित सूर्यवंशी, संतोष पोरे, विशाल नाईकवाडी, अक्षय यादव तर अण्णाभाऊ साठे नगरमधून काँग्रेसचे शंकर शिंदे, दीपक खंदारे, ओंकार कसबे, जनार्धन शिंदे, संग्राम जाधव, चंद्रकांत पाटूळे, अजय वाळा, बापू सातपुते, बापू भिसे, अजित कांबळे, धीरज चव्हाण, संदीप शिंदे, पिंटू भिंगरे, विशाल पवार यांनी पक्षात प्रवेश केला.

हा प्रवेश सोहळा आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपमध्ये येत असल्याचे चित्र पाहून स्थानिक पातळीवर चांगलीच चर्चा रंगली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश पक्षाला बळ देणारा मानला जात आहे.
या कार्यक्रमाला नेते सुनील चव्हाण,आनंद कंदले, सज्जनराव साळुंके,चंद्रकांतबापू कणे, प्रतीक रोचकरी, विशाल रोचकरी, शांताराम पेंदे, राम चोपदार, नरेश अमृतराव, औदुंबर कदम, किशोर साठे, अप्पा पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थिती होती.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे