ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
३ डिसेंबरला तुळजापूर पालिकेच्याकळसावर कोणाचा मुकुट? शहराची उत्सुकता शिगेला!
तुळजापूर नगरपरिषद निवडणूक रंगात; ११ प्रभागांत उमेदवारीची जोरदार चुरस!
0
6
7
8
4
1
३ डिसेंबरला तुळजापूर पालिकेच्याकळसावर कोणाचा मुकुट? शहराची उत्सुकता शिगेला!
तुळजापूर नगरपरिषद निवडणूक रंगात; ११ प्रभागांत उमेदवारीची जोरदार चुरस!
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण शहरात राजकीय तापमान चढले असून, प्रत्येक प्रभागात दिग्गज, नवोदित, तगडे व लोकप्रिय उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद होणार आहे. ११ प्रभागांत तुफान चुरस, तर नगराध्यक्ष पदावर ७ जणांचे रिंगण तयार झाले आहे.
प्रभाग १ : ‘तगड्यांचा संघर्ष’ – सहा उमेदवार रिंगणात जुन्या विरुद्ध नव्या नेतृत्वाची झुंज चांगलीच तापली आहे.
▪️देशमाने मंजुषा प्रसाद
▪️पाटील सुनिता प्रभाकर
▪️साबळे जयश्री सोमनाथ
▪️जगदाळे पंडित देवीचंद
▪️भोजने अर्जुन हनमंत
▪️जाधव लक्ष्मीकांत रामचंद्र
प्रभाग २ : ‘आठ उमेदवार… कठीण समीकरणे!’कदम घराण्याचा प्रभाव, पवार-रोचकरींची उपस्थिती आणि महिला उमेदवारांची ताकद विशेष ठरत आहे.
▪️कदम औदुंबर पंडितराव
▪️कदम शुभम कमलचंद
▪️खंदारे अजिंक्य युवराज
▪️कदम जीवन उपेंद्र
▪️क्षीरसागर नीता दिनेश
▪️रोचकरी कोमल आनंद
▪️पवार सुरेखा नितीन
▪️सोमाजी मीनाबाई रामचंद्र
प्रभाग ३ : ‘चार उमेदवार, सरळसरळ टक्कर!’येथे प्रभागाची लढत साधी असली तरी चुरस मात्र तुफानी.
▪️कदम अनुजा अजित
▪️पेंदे लखन भालचंद्र
▪️तट बालाजी रावसाहेब
▪️खारीकवाले साळुंके अर्जुन पोपट
प्रभाग ४ : ‘तरुणाई vs अनुभवी नेतृत्व’तरुण उमेदवारांचे वर्चस्व – महिलांचीही जोरदार एंट्री.
▪️रोचकरी सुनील संभाजीराव
▪️कदम सोंजी विनोद सुनील
▪️चोपदार श्रद्धा महेश
▪️साळुंके श्वेता वैभव
▪️वाघमारे अमृता सुदर्शन
प्रभाग ५ : ‘सहा उमेदवारांची कडवी भिडंत’कांबळे व भोसले यांच्यातील मुकाबला चर्चेत.
▪️साठे महानंताबाई किशोर
▪️चव्हाण भाग्यश्री प्रमोद
▪️कांबळे ममता नंदू
▪️कांबळे मीना अभिमान
▪️भोसले चंद्रशेखर बाळासाहेब
▪️चोपदार राकेश राजेंद्र
प्रभाग ६ : ‘कदम विरुद्ध पवार… कोण मारणार बाजी?’दोन घराण्यांची मजबूत पकड – लढत अतिशय रोमहर्षक.
▪️कदम सागर विलास
▪️कदम सुभाष मारुती
▪️अमृतराव सरोजा नरेश
▪️अमृतराव कृष्णा सचिन
▪️पवार अरुणा गोरक्षनाथ
प्रभाग ७ : ‘चार उमेदवार, प्रचार वेगात’येथे तरुण नेतृत्वाचे वर्चस्व दिसून येत आहे.
▪️खपले अमृता दादासाहेब
▪️लोंढे प्रगती गोपाल
▪️जाधव अंबरीश अशोकराव
▪️इंगळे रणजीत चंद्रकांत
प्रभाग ८ : ‘सात उमेदवार – समीकरणे गुंतागुंतीची!’मोठ्या संख्येने उमेदवार उतरल्याने मतविभाजन ठरणार निर्णायक.
▪️सावंत ज्योती अनंत
▪️रसाळ सुनिता अविनाश
▪️पांडागळे रेखा श्रीकांत
▪️लोकरे शितल भोलेनाथ
▪️घाडगे सुनील हनमंतराव
▪️कदम संतोष देविदास
▪️कदम अक्षय धनंजय
प्रभाग क्रमांक ९ : ‘रसाळ–कुतवळ–पवार तिरंगी लढत?’नेहमीप्रमाणे चर्चेत—एकापेक्षा एक दमदार उमेदवार.
▪️पवार अण्णाप्पा नामदेव
▪️कुतवळ अमोल माधवराव
▪️पवार अविनाश राजेंद्र
▪️निंबाळकर रमेश राजाराम
▪️कंदले जयश्री विजयकुमार
▪️रसाळ मोनिका श्रीकांत
प्रभाग १० : ‘चौघांचे रिंगण; मतदारांचे लक्ष केंद्रस्थानी’येथे प्रत्येक उमेदवार तगडा—लढत चुरशीची.
▪️रोचकरी सचिन ज्ञानोबा
▪️जगताप आनंद नानासाहेब
▪️गंगणे प्रियंका विजय
▪️मगर धरती चिन्मय
प्रभाग ११ : ‘आठ उमेदवार, भिडंत तुफानी!’या प्रभागात रोचकरी व खपले गटांमध्ये कट्टर स्पर्धा.
▪️रोचकरी अश्विनी विशाल
▪️कावरे बडोदकर संगीता शहाजी
▪️मलकूनाईक प्रिया मनोज
▪️शिंदे ममता वैभव
▪️अपराध प्रमोदिनी प्रशांत
▪️रोचकरी रामचंद्र सुखदेव
▪️कांबळे दत्ता सुदाम
▪️खपले राहुल विनोदराव
नगराध्यक्ष पद : सात दिग्गज “आमने-सामने”शहराच्या कळसाला मुकुट कोण बसवेल? तुळजापूरकरांचे डोळे निकालाकडे!
▪️शामराज विजय रमेश
▪️गंगणे विनोद विलासराव
▪️पवार अविनाश राजेंद्र
▪️कदम दत्तात्रय देविदास
▪️सिरसट संदीप अरुण
▪️मगर अमर अशोकराव,
▪️गिरीगोसावी महंत इच्छागिरी गुरुमहादेवगिरी (सोमवार गिरी मठ)
२ डिसेंबरला तुळजापूरकरांची धडधड वाढवणारे मतदान संपताच ३ डिसेंबरची रंगतदार मोजणी शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण करणार आहे. नगरपरिषदेच्या कळसावर कोणाचा विजयी मुकुट चढतो, हे पाहण्यासाठी संपूर्ण तुळजापूरची नजर निकालावर खिळली आहे.
0
6
7
8
4
1



