ब्रेकिंगमहाराष्ट्र
स्व. राजाराम नाईकनवरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजसेवेचा वसा; पंढरपुरात विविध सामाजिक उपक्रम
स्व. राजाराम नाईकनवरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजसेवेचा वसा; पंढरपुरात विविध सामाजिक उपक्रम

0
7
6
4
8
6
स्व. राजाराम नाईकनवरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजसेवेचा वसा; पंढरपुरात विविध सामाजिक उपक्रम
पंढरपूर : ज्येष्ठ समाजसेवक व कामगार नेते स्व. राजाराम नाईकनवरे उर्फ दादा यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त संतपेठ पंढरपूर येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

समाजसेवेचा वारसा जपत प्रतिष्ठान व मित्रपरिवाराच्या वतीने पाणपोई, वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन व भजन कार्यक्रम अशा उपक्रमांतून त्यांना अभिवादन करण्यात आले.
स्व. नाईकनवरे यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्य करत बहुजन समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. “देशसेवा हीच समाजसेवा” हा त्यांचा विचार युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पंढरपूर शहरात पाणपोई सुरू करण्यात आली.
तसेच गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी भजन व मिष्टान्न भोजन कार्यक्रम घेण्यात आला. माऊली शहरी बेघर निवारा केंद्रातील गरजूंनाही भोजन देण्यात आले.या कार्यक्रमास प्रणिताताई भालके, पंचायत समिती सभापती डॉ. शुभम आगवणे, अनिल सावंत, प्रदीप मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय कांबळे यांनी केले. या उपक्रमासाठी दीपक नाईकनवरे व स्व. राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0
7
6
4
8
6



