Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर येथे दरोडा प्रकरणात आरोपीस जामीन मंजूर-ॲड विशाल साखरे

तुळजापूर येथे दरोडा प्रकरणात आरोपीस जामीन मंजूर-ॲड विशाल साखरे

0 6 7 8 4 1

तुळजापूर येथे दरोडा प्रकरणात आरोपीस जामीन मंजूर-ॲड विशाल साखरे

धाराशिव,दि. ७ : प्रतिनिधी

तुळजापूर शहरातील दरोडा प्रयत्न प्रकरणात रेगुलर जामीन मिळवण्यात आरोपीस यश आले आहे. धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अमर गायकवाड (वय २३, तुळजापूर) यास जामीन मंजूर केला आहे.

सदर प्रकरणात तुळजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१९/२०२५ अंतर्गत कलम यु एस ३१०(४),३१०(५) भा.दं.सं. तसेच शस्त्र कायदा १९५९ च्या कलम ४,२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. दिनांक २१ सप्टेंबर रोजी पोलिसांना प्राप्त झालेल्या टिपच्या आधारे तुळजापूर येथे स्विफ्ट डिझायर गाडीतून काही तरुण दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी कार्यवाही करून गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपीच्या वतीने ॲड.विशाल साखरे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद सादर करताना,“सदर आरोपी हा शैक्षणिक विद्यार्थी असून, तुळजापूर येथे देवी दर्शनासाठी गेला होता. पोलिसांनी चुकीच्या समजुतीतून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे,” असा युक्तिवाद केला.

ॲड.साखरे यांनी मांडलेले मुद्दे ग्राह्य धरत माननीय जिल्हा न्यायाधीश,धाराशिव यांनी आरोपी अमर गायकवाड यास रेगुलर जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.या प्रकरणात आरोपीच्या वतीने . ॲड.विशाल साखरे यांच्यासोबत ॲड.मंजुषा साखरे,ॲड.महेश लोहार,ॲड.शुभम तांबे,ॲड . अर्चना कांबळे,ॲड.लक्ष्मीकांत कुलकर्णी,ॲड.अमित गोळे, ॲड.उदय आडेकर,ॲड.संकेत गोरे,ॲड.ओंकार कोरेगावकर, महेश पवार,पृथ्वीराज खोचरे आणि रोहित लोमटे यांनी सहकार्य केले.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे