ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
नन्नवरेंची ‘डबल एंट्री’! भाजप उमेदवारी न मिळाल्यास काय होणार? २०११ पासून पक्षाची हुलकावणी… नन्नवरे यंदा अपक्षाचीही तयारीत
प्रभाग १ ‘ब’ मध्ये राजकीय तापमान वाढले; नन्नवरे की जगदाळे?
0
7
6
4
8
6
नन्नवरेंची ‘डबल एंट्री’! भाजप उमेदवारी न मिळाल्यास काय होणार?
२०११ पासून पक्षाची हुलकावणी… नन्नवरे यंदा अपक्षाचीही तयारीत
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
प्रभाग १ मधील निवडणूक रंगतदार, नारायण नन्नवरे यांचा अखेर उमेदवारी अर्ज दाखल तुळजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून प्रभाग क्र. १ ‘ब’ मध्ये मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले नारायण नन्नवरे यांनी अखेर कार्यकर्ते व मतदारांच्या जिद्दीच्या आग्रहास्तव दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी एक अर्ज भाजपकडून तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल करण्यात आला आहे.

सन २०११ पासून पक्षात कायम सक्रिय राहूनही नगरसेवक पदापासून दूर ठेवण्यात आलेल्या नन्नवरे यांनी याच प्रभागातून विविध निवडणुकांत भाजपच्या उमेदवारांना आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला असल्याने पक्षाकडून त्यांना संधी मिळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जर उमेदवारी न मिळाल्यास नन्नवरे कोणती भूमिका घेतात आणि त्याचा नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेवर कसा परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सलग चार वेळा नगरसेवक—पंडित जगदाळे पुन्हा मैदानात
याच प्रभागातून सलग चार वेळा नगरसेवक राहिलेले पंडित जगदाळे यांनीही यंदा भाजप व तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तथापि, प्रभागात त्यांच्या विरोधात नाराजीचा सुर असल्याची चर्चा आहे. मतदार बदलाची मागणी करत असल्याने यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील ही चुरस अधिक तीव्र होत असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या प्रभागात नेमका राजकीय कल कुणाकडे झुकतो, हे पाहणे उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
0
7
6
4
8
6



