Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

धाराशिव शहराला २४ तास मुबलक पाणीपुरवठ्याची ग्वाही! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आश्वासन – बिहार विजयाचा भाजपकडून जल्लोषात स्वागत

0 6 7 8 4 1

धाराशिव शहराला २४ तास मुबलक पाणीपुरवठ्याची ग्वाही!

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आश्वासन – बिहार विजयाचा भाजपकडून जल्लोषात स्वागत

धाराशिव : प्रतिनिधी

धाराशिव शहराला २४ तास अखंड आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याची हमी देत, हे केवळ स्वप्न नाही… उजनी पाणीपुरवठा योजना जशी अशक्य वाटूनही आपण यशस्वी केली, तशीच ही योजनाही पूर्णत्वास नेणारच,अशी ठाम ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी दिली.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात साजरा केला. महापुरुषांना अभिवादन, फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि घोषणांनी चौक दणाणून गेला. या वेळी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विकास, विश्वास आणि संघटनेच्या बळावर एनडीएच्या विजयाला अधोरेखित केले.

▪️धाराशिवला २४x७ पाणी… हे आमचे प्राधान्य!– आमदार पाटील

तब्बल शंभर किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून आपण शहरासाठी पाणी आणले. उबाठा गटाला साधे नियोजनही करता आले नाही; पण आपण अशक्यप्राय योजना साकारल्या. पुढील काळात नगरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा मिळणारच,असे आमदार पाटील म्हणाले.

पालिका सत्तेत असताना ठाकरे गटाने शहराचे ‘वाटोळे’ केल्याचे आरोप करत त्यांनी पदाधिकार्‍यांनी नागरिकांच्या अडचणींवर सातत्याने लक्ष देण्याचे आवाहनही केले.

▪️बिहारने विकासाला मत दिले, देशाचा मार्ग अधिक भक्कम!

मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास, विकासाची दिशा आणि स्थिर कारभार यामुळे बिहारच्या जनतेने एनडीएला दिलेले अभूतपूर्व बहुमत हे “राष्ट्रीय विकासमार्गाला मिळालेला मोठा आधार” असल्याचे आमदारांनी सांगितले. धाराशिवची जनता देखील महायुतीसोबत आहे आणि आगामी पालिका निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

▪️विजयाचा जल्लोष — पेढे, लाडू आणि घोषणांचा उत्स्फूर्त आनंद

कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे-लाडू भरवून आनंद व्यक्त केला. भाजपा-एनडीएच्या मेहनती कार्यकर्त्यांचे आमदार पाटील यांनी अभिनंदन केले तसेच बिहारच्या जनतेचेही आभार मानले. यावेळी उपस्थित दत्ताभाऊ कुलकर्णी, सुरेशभाऊ देशमुख, नितीन काळे, नेताजी पाटील, अनिल काळे, अमित शिंदे, नितीन भोसले, सुनील काकडे, अभय इंगळे, युवराज नळे, नितीन शेरखाने, संपतराव डोके, पांडुरंग लाटे, प्रीतीताई कदम, अंजली बेताळे, विद्या माने, अभिजित काकडे, रमण जाधव, मनोज रणखांब, विलास सांजेकर, मेसा जानराव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक हजर होते.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे