Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर : तीन अज्ञात दरोडेखोरांनी प्रकाश घोडके यांच्याकडून सोन्याची चैन व रोख रक्कम लंपास

तुळजापूर पोलिसांचा तपास सुरू — तीन अनोळखी इसमांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्हीचा आधार!

0 7 6 4 8 7

तुळजापूर : तीन अज्ञात दरोडेखोरांनी प्रकाश घोडके यांच्याकडून सोन्याची चैन व रोख रक्कम लंपास

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा चौक परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. प्रकाश भाऊराव घोडके (वय ५८ वर्षे, रा. मारुणी ता. लोहारा जि. धाराशिव, ह.मु. गनराज कॉलनी, राहटणी, पिंपरी पुणे) हे आपल्या गाडीने जात असताना तडवळा शिवारात नैसर्गिक विधीसाठी थांबले असता तीन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवर येऊन त्यांच्याकडील अंदाजे १,३९,२२० किमतीची सोन्याची चैन आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली.

या प्रकरणी प्रकाश घोडके यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला असून, तिन्ही दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहने थांबवताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे