Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

“मातृभाषा, जन्मभूमी आणि कर्मभूमी’ हेच आयुष्याचे खरे स्तंभ-डॉ. दीपक सूर्यवंशी

"मातृभाषा, जन्मभूमी आणि कर्मभूमी’ हेच आयुष्याचे खरे स्तंभ-डॉ. दीपक सूर्यवंशी

0 6 7 8 4 1

“मातृभाषा, जन्मभूमी आणि कर्मभूमी’ हेच आयुष्याचे खरे स्तंभ-डॉ. दीपक सूर्यवंशी

कळंब : भिकाजी जाधव

भाषा ही फक्त संवादाचे साधन नसून माणसामाणसांना जोडून माणुसकी जिवंत ठेवण्याचं कार्य करते. त्यामुळे भाषा ही आपल्या संस्कृतीची आत्मा आहे, असं मत डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं.

ते तालुक्यातील हासेगाव (केज) येथील पद्मश्री शंकरबापू माध्यमिक विद्यालयात आयोजित ‘अभिजात भाषा सप्ताह’ या उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब यादव होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच महादेव यादव, तसेच शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर पालकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, “मराठी भाषा आज जगभरातील कोट्यवधी लोकांच्या ओठांवर आहे. गेल्या वर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून, तब्बल एक तपानंतर राज्य आणि केंद्र सरकारने मराठीला न्याय दिला आहे. या भाषेमुळे समाजभान जागृत राहते आणि आपुलकीची भावना अधिक दृढ होते.”

ते पुढे म्हणाले, “आपण कितीही परभाषा शिकलो तरी संकटाच्या वेळी आपल्या तोंडून येणारा पहिला शब्द मातृभाषेचाच असतो. त्यामुळे मातृभाषा, जन्मभूमी आणि कर्मभूमी हे आपल्या आयुष्यातील तीन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.”

कार्यक्रमात तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परमेश्वर पालकर यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक विवेक झाडपिडे यांनी तर आभार प्रदर्शन दत्तात्रेय कोल्हे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित हजारे, बाबासाहेब दराडे, रविंद्र गालफाडे आदींनी प्रयत्न केले.या वेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे