Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

हार-केकऐवजी शालेय साहित्याचा उपक्रम; बाळासाहेब भोसले यांनी नगराध्यक्षांचा समाजाभिमुख वाढदिवस साजरा केला

“विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची फुले; बाळासाहेब भोसले यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाला सामाजिक अर्थ”

0 7 6 4 8 6

हार-केकऐवजी शालेय साहित्याचा उपक्रम; बाळासाहेब भोसले यांनी नगराध्यक्षांचा समाजाभिमुख वाढदिवस साजरा केला

तुळजापूर | तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद उर्फे पिटू गंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवार, तुळजापूर यांच्या वतीने समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला.

श्री तुळजाभवानी केंद्रीय आश्रम शाळा तुळजापूर येथील विद्यार्थ्यांना अल्पोपहार व शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी पारंपरिक हार-पुष्पगुच्छ व केक यांना फाटा देत शालेय साहित्याचाच हार व केक तयार करून ते साहित्य विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले.

या उपक्रमाचे प्रमुख संयोजक बाळासाहेब भोसले यांनी “समाजासाठी काहीतरी देण्याचा आनंदच खरा उत्सव” असल्याचे सांगत शिक्षणासाठी हातभार लावण्याचा संदेश दिला. त्यांच्या पुढाकारामुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची छटालाभली.कार्यक्रमास प्रसाद पानपुडे, गणेश भिंगारे, श्री गवळी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इंद्रजित साळुंके व बाळासाहेब भोसले यांनी मनोगत व्यक्त करत भविष्यातही अशा विधायक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
समाजोपयोगी कृतीतून वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना नागरिकांतून कौतुकास्पद ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे