Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

जळकोट खून प्रकरणाचा अखेर उलगडा; ‘स्थानीक गुन्हे शाखे’ची दमदार कामगिरी !

पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली तपासाला गती !

0 6 7 8 4 1

जळकोट खून प्रकरणाचा अखेर उलगडा; ‘स्थानीक गुन्हे शाखे’ची दमदार कामगिरी !

पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली तपासाला गती !

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

जळकोट येथील वृद्ध महिला सुभद्रा रामशेट्टी पाटील यांच्या खून प्रकरणाचा अखेर थरारक उलगडा झाला असून, स्थानिक गुन्हे शाखेने केवळ तांत्रिक तपासाच्या जोरावर आरोपी महिलेला पुणे–भिगवणपर्यंत शोधून काढत ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या निर्देशानुसार पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार व सपोनि सुदर्शन कासार यांच्या पथकाने दाखवलेली तपासकौशल्याची चुणूक अतिशय कौतुकास्पद ठरली आहे.

२१ नोव्हेंबर रोजी सुभद्रा पाटील यांचा घरातच निर्घृण खून करून दागिने लंपास केल्याची घटना घडली. गुन्हा प्रथमदर्शनी गुंतागुंतीचा असतानाच, कोणत्याही ठोस सुरागांअभावी तपासास मोठे आव्हान उभे राहिले. मात्र, इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करत तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीची सांगड घालत, परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या वनिता सुरवसे हिचा मागोवा घेतला.

पुणे–भिगवणपर्यंत शोधमोहीम राबवत अखेर तिला ताब्यात घेतले असता, तिने पैशांच्या वादातून खून केल्याची कबुली दिली. मृत महिलेकडून उसने घेतलेल्या ४०,००० रुपयांच्या मुद्द्यावरून वाद वाढत गेल्याने आरोपीने मध्यरात्री गुन्हा केल्याचे उघड झाले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या चपळ, वेगवान आणि नेमक्या तपासामुळे अल्पावधीतच खून प्रकरणाचा उलगडा झाला.या कामगिरीत पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार यांची तपासातील दृष्टी, तांत्रिक अचूकता आणि पथकातील समन्वय ठळकपणे उठून दिसला.पथकात सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण, पोह प्रकाश औताडे, चापोह सुभाष चौरे, रत्नदिप डोंगरे व नागनाथ गुरख यांनी सहभाग नोंदवला.गावातही आरोपीच्या अटकेनंतर सुटकेचा श्वास टाकण्यात आला असून, जिल्हा पोलीस दलाच्या या वेगवान कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे