Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

समाजसेवेची अनोखी प्रेरणा — जैन समाज संघटनेतर्फे पारधी वस्तीत किराणा व औषधी किट वाटप

0 7 6 4 8 6

समाजसेवेची अनोखी प्रेरणा — जैन समाज संघटनेतर्फे पारधी वस्तीत किराणा व औषधी किट वाटप

कळंब : प्रतिनिधी

धाराशिव जिल्हा जैन समाज संघटनेतर्फे शाळा, पारधी वस्ती, महादेव नगर येथे सामाजिक बांधिलकी जोपासणारा एक प्रशंसनीय उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पुरग्रस्त भागातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना किराणा किट तसेच औषधी किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. उल्लासजी चाकवते (धाराशिव), सुहास हिंदाणे, हर्षद आंबुरे (कळंब), निशिकांत संगवे (कळंब) आणि अतुल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षांनी आपल्या मनोगतात समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संघटनेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दराडे ए. डी., श्री. शिंदे डी. व्ही., श्रीमती डांगे एम. पी. यांनी विशेष परिश्रम घेतले, तर श्री. होगले एच. एफ. यांनी कार्यक्रमाचे आकर्षक सूत्रसंचालन केले.

या प्रसंगी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजसेवेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

✍️ धाराशिव जिल्हा जैन समाज संघटना – “समाजसेवा हीच खरी साधना” 🙏

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे