Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

धाराशिव पोलिस दलात “वॉर रूम”ची स्थापना — गुन्हे अन्वेषणात तांत्रिक आणि मानवी समन्वयाचा नवा अध्याय!

धाराशिव पोलिस दलात “वॉर रूम”ची स्थापना — गुन्हे अन्वेषणात तांत्रिक आणि मानवी समन्वयाचा नवा अध्याय!

0 7 6 4 8 6

धाराशिव पोलिस दलात “वॉर रूम”ची स्थापना — गुन्हे अन्वेषणात तांत्रिक आणि मानवी समन्वयाचा नवा अध्याय!

धाराशिव, दि. २९ : गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था व्यवस्थापनासाठी धाराशिव जिल्हा पोलीस दलात अत्याधुनिक “वॉर रूम”ची स्थापना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेन्द्र मिश्र यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात या वॉर रूमचे उद्घाटन संपन्न झाले. या वॉर रूममुळे गुन्हे तपासात तांत्रिक साधनांचा वापर, वेगवान निर्णयप्रक्रिया आणि समन्वय अधिक परिणामकारक होणार असल्याचे मत श्री. मिश्र यांनी व्यक्त केले.

या वॉर रूमच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गुन्हे, तपास प्रगती, गुन्हेगारांचे प्रोफाइल, तसेच घटनास्थळांचे नकाशे एकत्रितपणे पाहता येणार आहेत. फॉरेन्सिक अहवाल, CDR/SDR विश्लेषण, सायबर ट्रेसिंग आणि GIS मॅपिंगच्या साहाय्याने गुन्ह्यांच्या तपासाला नवी गती मिळणार आहे. तसेच मोर्चे, रेड, कॉम्बिंग ऑपरेशन यावेळी ड्रोनच्या साहाय्याने थेट दृश्य प्रसारणाद्वारे घटनास्थळी नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे.

गुन्हे तपासातील विविध शाखांतील वरिष्ठ अधिकारी एकाच ठिकाणी समन्वय साधून आकस्मिक परिस्थितींना तात्काळ प्रतिसाद देऊ शकतील. यामुळे वेळेवर आणि अचूक निर्णय घेणे शक्य होणार आहे.

या सोहळ्याला पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश देशमुख (तुळजापूर), श्री. संजय पवार (कळंब), श्री. अनिल चोरमले (भूम), श्री. सदाशिव शेलार (उमरगा), श्री. सुरेशकुमार राऊत (धाराशिव शहर) यांसह श्रीमती अश्विनी भोसले (आर्थिक गुन्हे शाखा), श्री. विनोद ईज्जपवार (स्थानिक गुन्हे शाखा), श्री. अमोद भुजबळ (विशेष शाखा), श्री. शकील शेख (सायबर), श्री. प्रमोद भिंगारे (तांत्रिक विश्लेषण शाखा), तसेच श्री. सोमवंशी (एटीसी), श्रीमती घोगरे, श्री. चासकर, श्री. हिंगोले आदी अधिकारी उपस्थित होते.

धाराशिव पोलिस दलासाठी ही वॉर रूम म्हणजे “तांत्रिक आणि मानवी समन्वयाचा नवा अध्याय” ठरून जिल्ह्याच्या गुन्हे तपास व कायदा सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे