ब्रेकिंगमहाराष्ट्र
भिमनगरात आंबेडकर जयंती उत्सव कार्यकारिणी जाहीर; मिरवणूक अध्यक्षपदी अजय कदम
भिमनगरात आंबेडकर जयंती उत्सव कार्यकारिणी जाहीर; मिरवणूक अध्यक्षपदी अजय कदम

0
7
6
4
9
7
भिमनगरात आंबेडकर जयंती उत्सव कार्यकारिणी जाहीर; मिरवणूक अध्यक्षपदी अजय कदम
तुळजापूर : शहरातील भिमनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उत्सव कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून मिरवणूक अध्यक्षपदी अजय कदम यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी ओम भालेकर व दीपक सोनवणे यांची निवड जाहीर झाली.
नगरसेवक सागर कदम यांच्या अध्यक्षतेखाली समाजमंदिरात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी जयंती उत्सव विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मिरवणूक सचिवपदी प्रकाश कदम, कोषाध्यक्षपदी सुरज कदम, सहकोषाध्यक्षपदी रोहित पांडागळे यांची निवड झाली. तसेच मिरवणूक प्रमुख म्हणून दादा सरकार कदम, अक्षय कदम, अनुज कदम, नागेश कदम, अतिश कदम, पृथ्वीराज कदम, रोहित कदम यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.मार्गदर्शक प्रमुख म्हणून दाजीबा कदम, आप्पा कदम, बंडू कांबळे, हिराचंद सोनवणे, बापू भालेकर, नंदकुमार कदम, दीपक कदम यांची नियुक्ती करण्यात आली. सजावट प्रमुखपदी बापू कांबळे, विनोद भालेकर, विजय कदम, बापू सोनवणे यांची निवड झाली.


या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते निलेश अमृतराव यांच्यासह किरण कदम, काळू कदम, गोकुळ कदम, शुभम बल्ली कदम, सोमनाथ पांडागळे, राहुल सोनवणे, सुधीर सोनवणे, सुहास कदम, दीपक कदम, आशुतोष कदम, आदित्य कदम, रत्नदीप कदम, प्रेम कदम, अमर कदम, मयूर कदम, ओम कदम, करण कदम, पुष्पराज कदम, बालाजी माने, संदिप माने, समर्थ कदम, सुरज कदम, सिद्धांत कदम, अनिकेत कदम, बबन कदम, परसु भालेकर, खोब्या सोनवणे, हर्षदीप सोनवणे, प्रेम सोनवणे, अर्जुन कदम, दादा भालेकर, प्रमोद सिद्धगणेश, अजय कदम, दयानंद साबळे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
7
6
4
9
7




