ब्रेकिंगमहाराष्ट्र
कोळगाव येथे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
कोळगाव येथे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

0
7
6
4
8
6
कोळगाव येथे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
कोळेगाव : मौजे कोळगाव येथे शिव–कीर्ती युवा मंच शाखा कोळेगाव यांच्या वतीने अकलूज नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळेत खाऊ वाटप करून अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास शिवसृष्टी मल्टीमीडिया लेझर शोचे संचालक श्री. धनंजय (भाऊ) दुपडे तसेच अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन सावंत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नितीन सावंत पाटील यांनी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात प्रभावी काम करणारे नेतृत्व म्हणून शिवबाबांनी कमी वयातच विविध संस्थांमध्ये जबाबदारी सांभाळली असून, त्या संधीचे सोने करत त्यांनी अकलूज नगरपालिकेच्या उप नगरध्यक्षपदापर्यंत उत्तम कार्य केले आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांनी त्यांना उदंड आयुष्य व अनंत शुभेच्छा दिल्या.या वेळी पिलीव गावचे युवक सोहेल बागवान, शिवकीर्ती युवा मंच शाखा कोळेगावचे अध्यक्ष सुभाष बंदपट्टे, दत्तात्रय गेजगे, रानोबा पारसे, संतोष धांडोरे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कोळेगावमधील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
7
6
4
8
6




