Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तिर्थक्षेत्र तुळजापूरची बदनामी जनता विसरणार नाही – आ. राणाजगजीतसिंह पाटील

विकासाला अडथळे आणणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवेल जनता !

0 7 6 4 8 6

तिर्थक्षेत्र तुळजापूरची बदनामी जनता विसरणार नाही – आ. राणाजगजीतसिंह पाटील

विकासाला अडथळे आणणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवेल जनता !

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापत असताना आर्य चौकात झालेल्या भाजपच्या कॉर्नर सभेत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी विरोधकांवर तुफान हल्लाबोल करत विकास अजेंड्याला नव्याने धार दिली. तुळजाभवानीच्या पावन भूमीची राजकीय बदनामी करणाऱ्यांना जनता विसरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सभेला कार्यकर्ते व नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तुळजापूरची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना जनता ओळखते – आ. पाटील

अष्टभुजा मातेसह लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूरची प्रतिमा मलिन करण्याचा काहींनी प्रयत्न केला होता.तुळजापूरची जनता हे विसरणार नाही. मतदानरूपी आशीर्वादातून अशांना योग्य धडा मिळेल,असे आ.पाटील म्हणाले. त्यांच्या वक्तव्याला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट मिळाला.

भाजप उमेदवारांना ‘ऐतिहासिक विजय’ देण्याचे आवाहन

भाजपने नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागांत सक्षम, तरुण आणि विकासाभिमुख उमेदवार उभे केले असल्याचे सांगत पाटील म्हणाले,तुळजापूरच्या विकासाचा पाया मजबूत करण्याची ही सुवर्णसंधी आहे. प्रत्येक प्रभागात भाजप उमेदवारांना ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करा.सभेतील उपस्थिती, पदाधिकाऱ्यांचा उत्साह आणि तरुणाईचा सहभाग पाहता भाजपच्या प्रचाराला वेग मिळाल्याचे चित्र निर्माण झाले.

रेल्वे प्रकल्प,रस्ते, पार्किंग – विकासाचा रोडमॅप केंद्रस्थानी

तुळजापूरच्या यात्राधिष्ठित अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती देत आ. पाटील म्हणाले-२०१९ मधील रेल्वे भूमिपूजनामुळे भाविकांची संख्या वाढेल
हुतात्मा स्मारक–पावनारा गणपती रस्त्याची तरतूद

प्रभाग ४ आणि ७ मधील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी विशेष आराखडा,महाद्वारातून मंदिर प्रवेशाची मागणी मान्य“उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी आवश्यक कामे आता गतिमान करणार आहोत,” असेही पाटील यांनी अधोरेखित केले.

विरोधकांवर तुफान शाब्दिक प्रहार सभेत विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करत पाटील म्हणाले -“सत्तेत असताना एका रुपयाची मदतही त्यांनी केली नाही. साधा पाकीटमारही न पकडणारे आता मोठ्या गप्पा मारतात.“विकासाचे नाही, व्यक्तीगत राजकारण करण्यात विरोधक पुढे”भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचे कौतुक करत ते म्हणाले -“चूक झाली म्हणून राजकारण करणे अन्यायकारक आहे. सर्वगुणसंपन्न कोणी नसते. कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत”

“तुम्ही ताकद दिलीत तर ऊर्जा आमच्यात दुपटीने वाढते” – भावनिक आवाहन

आगामी प्रशासन पारदर्शक राहण्याचा विश्वास देत पाटील म्हणाले -“मोठी प्रक्रिया उभारायची आहे. एकट्याने शक्य नाही. तुळजापूरच्या सर्व नागरिकांनी ताकद दिली तर विकासाची गती कोण थांबवू शकत नाही.”

विनोद गंगणे यांचे ‘८०% समाजकारण, २०% राजकारण’

नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचा आमदार राणा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
“८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारे विनोद पिटू गंगणे हे तुळजापूरच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत,” असे ते म्हणाले.प्रा. संभाजी भोसले, ॲड. अनिल काळे, आनंद कंदले, पंडितराव जगदाळे, सुनिल रोचकरी, शिवाजी बोंधले यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

विरोधकांचे ‘बदनामी कट’ – आठ हजार मतांनी पराभवाचे संकेत?

सभेत संतोष परमेश्वर यांनी विरोधकांनी “ठरवून कोडीत पकडून बदनामी करण्याचे षड्यंत्र सुरू केले” असा आरोप करत म्हटले“विनोद गंगणे यांना उमेदवारी मिळाल्यापासून एकाच व्यक्तीला टार्गेट करण्याचा अजेंडा सुरु केला आहे. पण अष्टभुजा मातेसह जनता सोबत असल्याने आठ हजार मतांनी विजय मिळेल.”

पुजारी मंडळाचा ठाम विश्वास

पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके म्हणाले“भाजपाचे सर्व उमेदवार घराणेशाहीतून आलेले नाहीत. राजकारणाचा गंधही नव्हता; पण कार्यातून ठसा उमटवला आहे.”

नवे प्रवेश – तुळजापूर भाजपची ताकद वाढली सभेत अनेक मान्यवरांचा भाजपात औपचारिक प्रवेश झाला

प्रा. संभाजी भोसले,
डॉ. अनुजाताई परमेश्वर (विनाविरोध विजय)
मधुकर शेळके (उमेदवारी माघार)
महावीर पिटू कंदले उमेदवार – श्वेता वैभव साळुंके अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सत्कार

प्रभाग ७ – नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य

प्रभाग ७ मधील रस्ता, वाहतूक, वृद्ध–महिला भाविकांसाठी पार्किंगची समस्या आदी मुद्द्यांचा आढावा घेत उपाययोजना तत्काळ करण्याचे आश्वासन देण्यात आले.

तुळजापूर कुणाच्या बाजूला?

भाजपची ही कॉर्नर सभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण अधिक तापवणारी ठरली.विकासाचे आश्वासन, विरोधकांवरील टीका आणि तुळजापूरच्या यात्राधिष्ठित अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचे मानस, यामुळे महत्त्वपूर्ण राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.शेवटी निर्णय मात्र आई भवानीच्या पवित्र नगरीतील मतदारांच्या हातातच.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे