Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

धाराशिव शहरातील रस्ते कामांना हिरवा कंदील! विरोधकांचे अडथळे कोसळले; ५९ रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू होणार !

स्थगिती अखेर रद्द - आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची ठाम माहिती

0 7 6 5 0 6

धाराशिव शहरातील रस्ते कामांना हिरवा कंदील! विरोधकांचे अडथळे कोसळले; ५९ रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू होणार !

स्थगिती अखेर रद्द – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची ठाम माहिती

धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव शहरातील नागरिकांच्या संयमाचा अंत झाला आहे. नगरोत्थान योजनेतून मंजूर शहरातील रस्ते व नाल्यांच्या कामांवरील स्थगिती अखेर रद्द करण्यात आली असून, तब्बल ५९ रस्ते व नाल्यांची कामे आता युद्धपातळीवर सुरू होणार आहेत. ही महत्त्वपूर्ण माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी आमदार पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेतून ११७ कोटींचा भरीव निधी मंजूर झाला. या निधीतून शहरातील ५९ रस्ते व नाल्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.मात्र निधी मंजूर होताच काही अपप्रवृत्तींच्या विरोधकांनी अकार्यक्षमता उघडी पडण्याच्या भीतीने या कामांना आडकाठी आणण्यासाठी वेगवेगळे डाव खेळले. निवेदन, तक्रारी आणि दबावतंत्र वापरून कामे अनेक महिने प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हार न मानता सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला.धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यारंभ आदेश दिला होता, तर २८ ऑक्टोबरला प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली होती. मात्र काही निवेदनांच्या आधारे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्रावरून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती स्थगिती दिली.या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर ४ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात आली असता, संपूर्ण प्रक्रिया नियमबद्ध व पारदर्शक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे स्थगिती तत्काळ उठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, जिल्ह्यात आचारसंहिता लागू असल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करता आली नव्हती. आता स्थगिती रद्द झाल्याचे अधिकृत पत्र जारी झाल्याने सर्व अडथळे दूर झाले आहेत. अनेक महिन्यांपासून नागरिकांची सुरू असलेली हेळसांड आता संपणार असून, रस्त्यांची दुरवस्था इतिहासजमा होणार आहे.
पालिका निवडणुकीत जनतेने भाजपाला भरघोस कौल दिल्यानंतर लगेचच ही दिलासादायक बातमी आल्याने शहरात समाधानाचे वातावरण आहे. उद्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून औपचारिक शुभारंभ लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे