ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तुळजापूर तालुक्यासाठी कार्डियक ॲम्ब्युलन्स मंजुरी प्रक्रियेला गती;अमोल जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

0
7
6
4
9
7
तुळजापूर तालुक्यासाठी कार्डियक ॲम्ब्युलन्स मंजुरी प्रक्रियेला गती;अमोल जाधव यांच्या पाठपुराव्याला यश
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यासाठी अत्यावश्यक असलेली कार्डियक ॲम्ब्युलन्स मिळण्यासाठीची प्रक्रिया आता वेगात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अमोल जाधव यांनी मा. पालकमंत्री तथा परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचेकडे दाखल केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे नियमानुसार कार्यवाही करण्याचे अधिकृत पत्र पाठविले आहे. दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी झालेल्या पत्रात निवेदनाचा तपशील तसेच आवश्यक कार्यवाही करून पालकमंत्री कार्यालयास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांना संदर्भ क्रमांक १ व २ सोबत जोडलेल्या निवेदनाचा विचार करून लवकरात लवकर कार्डियक ॲम्ब्युलन्स संदर्भातील निर्णय देण्यास सांगण्यात आले आहे. या प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, याबाबतही स्पष्ट सूचनांचा समावेश आहे.
तुळजापूर तालुक्यासाठी अत्याधुनिक कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाल्यास तालुक्यातील जनतेला तातडीची हृदयविकाराची सेवा अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने मिळणार आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सुविधा जीव वाचविणारी ठरणार आहे.या संदर्भात बोलताना अमोल जाधव यांनी सांगितले की,“तुळजापूर तालुक्यातील नागरिकांना तातडीची हृदयविकार उपचार सुविधा देणे अत्यंत गरजेचे आहे. पालकमंत्री महोदयांनी विषय गांभीर्याने घेतल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. लवकरच ही सुविधा उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.” अमोल जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तुळजापूरमध्ये महत्त्वाच्या आरोग्य सुविधेचा मार्ग मोकळा होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

0
7
6
4
9
7



