Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

अमर मगर यांच्या प्रचारावर “चाकू”? अज्ञातांनी बॅनर फाडून दिला धक्का

तुळजापूरात बॅनरफाडची धक्कादायक घटना—काँग्रेसचा संतप्त सवाल: “हे कोणाचं राजकारण?”

0 7 6 4 9 7

अमर मगर यांच्या प्रचारावर “चाकू”? अज्ञातांनी बॅनर फाडून दिला धक्का

तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापत असतानाच काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांच्या प्रचाराला धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील चौकाचौकात लावलेला अमर मगर यांच्या प्रचाराचा बॅनर जानून–बुजून फाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी हा बॅनर फाडल्याची घटना घडली. सकाळी कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. यामुळे कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली असून, हा प्रकार निवडणूक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

अमर मगर यांच्या समर्थकांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून, “लोकशाही पद्धतीने लढली जाणारी निवडणूक असताना अशा नामुष्कीच्या घटना घडणे दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगारांचा माग शोधून, गुन्हेगारांना चाप द्यावा अशी प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या प्रकारामुळे निवडणुकीचे वातावरण आणखी चुरशीचे होण्याची शक्यता आहे.

अज्ञात इसमाविरोधात तुळजापूर पोलिसात तक्रार; कडक कारवाईची मागणी – रूषीकेश मगर

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरात राजकीय वातावरण तापत असतानाच काँग्रेस आय पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर अशोकराव मगर यांच्या प्रचाराला धक्का देणारी घटना समोर आली आहे. प्रभाग क्र. ६, आराधवाडी येथे लावण्यात आलेला प्रचाराचा डिजिटल बॅनर अज्ञात इसमाने फाडल्याची तक्रार श्री. ऋषीकेश अशोकराव मगर यांनी तुळजापूर पोलिसात दिली.मगर यांनी दिलेल्या अर्जात, निवडणूक प्रचारादरम्यान अशी तोडफोड हेतूपुरस्सर करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अर्जदाराने केली आहे. घटनेचे छायाचित्र पुराव्यासह पोलिस प्रशासनाकडे सादर करण्यात आले. राजकीय वातावरण आधीच चुरशीला पोहोचले असताना झालेल्या या प्रकारामुळे प्रभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे