Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

निवडणूक काळात शांतता बिघडू नये; सतर्कतेचे निर्देश — जिल्हाधिकारी पूजार!

निवडणूक काळात शांतता बिघडू नये; सतर्कतेचे निर्देश — जिल्हाधिकारी पूजार!

0 6 7 8 4 1

निवडणूक काळात शांतता बिघडू नये; सतर्कतेचे निर्देश — जिल्हाधिकारी पूजार!

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत असून, या संपूर्ण कालावधीत जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिले आहेत.

२० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय निवडणूक संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, नगरपरिषद प्रशासन विभागाचे सहआयुक्त त्रिंबक ढेगळे, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पूजार म्हणाले, “निवडणूक काळात पोलिसांनी अलर्ट मोडवर काम करावे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विशेष सुरक्षा उपाययोजना कराव्यात. रोख रक्कम व पैशांची देवाणघेवाण रोखण्यासाठी कडक पाळत ठेवावी. मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी दारू किंवा पैशाचा वापर होणार नाही यासाठी जप्तीची मोहीम राबवावी.”

ते पुढे म्हणाले, “जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृती मोहिमेला ताकद देणे आवश्यक आहे.”

निवडणूक ड्युटीवरील आणि त्याच नगरपालिकेच्या मतदारयादीत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल मतदानाची सोय करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. पूजार यांनी दिली.

बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक हर्षवर्धन शिंदे, पब्लिक वर्क्स विभागाचे अधीक्षक अभियंता एन. व्हि. भंडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) डी. बी. पारेकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहायक राज्यकर आयुक्त प्रदीप चव्हाण, वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता श्रीमती एन. एम. कुलकर्णी, तसेच परिवहन विभागाचे सहायक उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत साळी उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागांकडून निवडणूक अनुषंगाने करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा बैठकीत मांडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे