ब्रेकिंगमहाराष्ट्र
कला केंद्र प्रकरणात ७ आरोपींना जामीन; जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय
कला केंद्र प्रकरणात ७ आरोपींना जामीन; जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

0
6
7
8
4
1
कला केंद्र प्रकरणात ७ आरोपींना जामीन; जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

धाराशिव : धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 36/2022 अंतर्गत कला केंद्रातील पीडित महिलेला जबरदस्तीने व्यावसायिक शोषणासाठी प्रवृत्त करून डांबून ठेवत अत्याचार केल्याप्रकरणी नोंद असलेल्या गुन्ह्यातील सात आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात दोन पुरुष व पाच महिलांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात IPC कलम 115(2), 351(3), 64(2)(m), 3(5), सह 34 तसेच Prevention of Immoral Human Trafficking Act 1956 अंतर्गत कलम 3, 5, 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन पुरुष आरोपींनी नियमित जामीन अर्ज तर तीन महिला आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.या अर्जांवर काल दि. 17 मार्च 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी आरोपींच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावी युक्तिवाद करत फिर्यादीच्या तक्रारीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फिर्याद उशिराने दाखल करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत, पीडितेचे आरोप खोटे असल्याचे सांगितले. संबंधित महिला कला केंद्रात कलाकार म्हणून कार्यरत होती व तिने करार करून मानधन स्वीकारले असल्याचा दावा करण्यात आला.तसेच आरोपी हे कला सादरीकरण करून उपजीविका करत असून त्यांना खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचेही बचाव पक्षाने मांडले. हा युक्तिवाद ग्राह्य धरत माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. खोमणे यांनी आरोपींचा नियमित व अटकपूर्व जामीन मंजूर केला.या प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा विशाल साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. संकेत गोरे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे, महेश पवार व पृथ्वीराज खोचरे यांनी सहकार्य केले.
0
6
7
8
4
1



