Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

नळदुर्ग पोलिसांची कारवाई — अवैध गुटखा व तंबाखू विक्रेत्यांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद

नळदुर्ग पोलिसांची कारवाई — अवैध गुटखा व तंबाखू विक्रेत्यांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद

0 7 6 4 8 6

नळदुर्ग पोलिसांची कारवाई — अवैध गुटखा व तंबाखू विक्रेत्यांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद

नळदुर्ग : प्रतिनिधी

राज्यात गुटखा, पानमसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असताना देखील काहीजण सर्रासपणे विक्री करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशाच दोन प्रकरणांमध्ये नळदुर्ग पोलिसांनी कारवाई करत दोन जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र नामदेव शिंदे (वय 42, रा. वसंतनगर, नळदुर्ग ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हा दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 4.00 वा. सुमारास जिल्हा प्राथमिक शाळा, वसंतनगर समोर रोडवर सार्वजनिक ठिकाणी विमल पान मसाला (किंमत ₹370) विक्रीसाठी जवळ बाळगलेला असताना पोलिसांच्या हाती सापडला.

तसेच दुसऱ्या प्रकरणात आरोपी नामदेव नागनाथ गायकवाड (वय 34, रा. वसंतनगर, नळदुर्ग) हा देखील त्याच ठिकाणी सायं. 3.45 वा. सुमारास विमल पान मसाला व गायछाप तंबाखू (एकूण किंमत ₹470) विक्रीसाठी जवळ बाळगलेला आढळला.

या कारवाईत पोलिसांनी संबंधित गुटखा व तंबाखू साहित्य जप्त केले असून दोन्ही आरोपींविरुद्ध कलम 6(ब), 24 — सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात, व्यापार, पुरवठा व विनिमय प्रतिबंध) अधिनियम 2003 अन्वये नळदुर्ग पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

स्थानिक पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून सार्वजनिक ठिकाणी अवैध तंबाखू विक्रीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे