ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
दिल्लीमध्ये विहिप केन्द्रीय मार्गदर्शक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक; २०० संतांची उपस्थिती, व्यसनमुक्तीचा निर्धार
दिल्लीमध्ये विहिप केन्द्रीय मार्गदर्शक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक; २०० संतांची उपस्थिती, व्यसनमुक्तीचा निर्धार

0
7
6
4
8
7
दिल्लीमध्ये विहिप केन्द्रीय मार्गदर्शक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक; २०० संतांची उपस्थिती, व्यसनमुक्तीचा निर्धार
नवी दिल्ली : प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषद (विहिप) यांच्या केन्द्रीय मार्गदर्शक मंडळाची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार व बुधवार, दि. ९ व १० डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. देशभरातील विविध राज्यांतून सुमारे २०० पूज्य संत या बैठकीस उपस्थित होते. विशेषतः वाढती व्यसनाधीनता व ड्रग्सच्या समस्येवर विजय मिळवण्याचा ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

विहिपचे केन्द्रीय उपाध्यक्ष चंपतराय यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, देशातील सद्यस्थिती लक्षात घेता ही बैठक अत्यावश्यक मानण्यात आली होती. बैठकीत राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करून पुढील कार्ययोजना ठरविण्यात आली.

या बैठकीत
▪️ राज्य सरकारांनी अधिग्रहित केलेल्या मंदिरांच्या मुक्तीसाठी अभियानात्मक कार्ययोजना
▪️ केंद्र व राज्य पातळीवर धर्मस्वातंत्र्य कायदा प्रभावीपणे लागू करण्याची गरज
▪️ समाजात वाढत चाललेल्या व्यसनाधीनता व ड्रग्सविरोधात नशामुक्ती अभियान
▪️ जनगणना (ORP) व लोकसंख्या असंतुलनामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थितीवर उपाय
या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

देवगिरी प्रांतातून महंत ईच्छागिरी महाराज आणि महंत मावजीनाथ महाराज यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. दोन्ही महंतांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील धार्मिक स्थळे, मंदिर व्यवस्थापनासंदर्भातील समस्या तसेच तुळजापूरमध्ये वाढत चाललेल्या ड्रग्सच्या प्रश्नाकडे केन्द्रीय नेतृत्वाचे लक्ष वेधले. या प्रश्नांवर संघटनात्मक पातळीवर ठोस उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

महंत ईच्छागिरी महाराज व महंत मावजीनाथ महाराज यांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी संत, समाज आणि संघटनांनी एकत्र येऊन व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मांडणीला उपस्थित संतांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

ही बैठक बाबा नत्थासिंह वाटिका, सी. के. बिड़ला हॉस्पिटलसमोर, पंजाबी बाग पश्चिम, नवी दिल्ली येथे पार पडली. देशभरातील धार्मिक व सामाजिक क्षेत्राचे लक्ष या बैठकीकडे लागले असून, या बैठकीतून आगामी काळातील विहिपची संघटनात्मक दिशा व सामाजिक चळवळींसाठी ठोस धोरण निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0
7
6
4
8
7



