Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

पारदर्शक प्रशासन, २४ तास पाणीपुरवठा आणि खड्डेमुक्त रस्त्यांचा भाजपाचा पाच कलमी निर्धार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रतिपादन

पारदर्शक प्रशासन, २४ तास पाणीपुरवठा आणि खड्डेमुक्त रस्त्यांचा भाजपाचा पाच कलमी निर्धार - आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रतिपादन

0 7 6 4 9 6

पारदर्शक प्रशासन, २४ तास पाणीपुरवठा आणि खड्डेमुक्त रस्त्यांचा भाजपाचा पाच कलमी निर्धार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रतिपादन

धाराशिव : प्रतिनिधी

“कधीकाळी १०० टँकरवर जगणाऱ्या धाराशिव शहराला आता २४ तास स्वच्छ, मुबलक पाणी मिळणार आहे. उजनी पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराचा चेहरामोहरा पालटला आहे. पुढील टप्प्यात हे शहर ‘पाणीसंपन्न आणि बागबगीचे असलेले सुंदर शहर’ म्हणून राज्यात आदर्श ठरेल,” असा ठाम विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

पालिका निवडणूक लक्षात घेऊन प्रतिष्ठान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपाचा पाच कलमी निर्धार जाहीर केला. शहरातील समस्या व मतदारांच्या सूचना प्रत्यक्ष भेटीतून जाणून घेतल्या असून, त्यातील अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश जाहीरनाम्यात केल्याचे त्यांनी सांगितले.

२४ तास पाणी व शहर सुंदरतेवर भर

आमदार पाटील म्हणाले की,
उजनी योजनेमुळे निर्माण झालेली पायाभूत सुविधा बळकट करून २४ तास स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचा निर्धार आहे.रस्ते,नाली आणि विद्युतव्यवस्थेसाठी ३०० कोटींचा निधी पुढील पाच वर्षांत आणण्याचा प्रयत्न आहे.

शहरभरातील कचरा संकलनासाठी स्वतंत्र नियोजन, आधुनिक यंत्रसामग्री आणि दररोज कचरा प्रक्रिया अशी प्रभावी योजना राबवली जाणार आहे. “कचर्‍याचे डोंगर पूर्णपणे हटतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आकर्षक उद्याने – शहराचे हिरवे स्वप्न

शहरात दोन ठिकाणी प्रत्येकी चार कोटींची उद्याने मंजूर असून, शिवाय नमो उद्यानाचाही समावेश झाला आहे. एकूण २५ कोटींच्या खर्चातून उद्याने, हरितपट्टे आणि वृक्षलागवड करून शहराला नव्या रूपात उभे केले जाणार आहे.

पारदर्शक प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी होणार आहे.
नागरिकांना व्हॉट्सअपवरून तक्रार नोंदविण्याची सुविधा, पालिकेत न येताही अनेक सेवांचा पुरवठा — अशी नागरिकाभिमुख व्यवस्था उभारली जाणार असल्याचे पाटील म्हणाले.

“ऐतिहासिक विकासकामे आपण यापूर्वी केली आहेत आणि पुढील पाच कलमी निर्धारातून धाराशिवचा सर्वांगीण विकास साधण्याची क्षमता भाजपात आहे,” असे आमदार पाटील म्हणाले.या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहा राहुल काकडे, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नेताजी पाटील, माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे, संपतराव डोके, सुनील काकडे, युवराज नळे, नितीन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे