ब्रेकिंगमहाराष्ट्र
पवनचक्की खंडणी प्रकरणात दिलासा; तुळजापूर न्यायालयाकडून दोघांना जामीन मंजूर
ॲड. विराज जगदाळे यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला निर्णायक

0
7
6
5
0
5
पवनचक्की खंडणी प्रकरणात दिलासा; तुळजापूर न्यायालयाकडून दोघांना जामीन मंजूर
ॲड. विराज जगदाळे यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला निर्णायक
तुळजापूर, : तालुक्यातील मंगरूळ-इटकळ रोडवरील दत्त मंदिर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पवनचक्की खंडणी व मारहाण प्रकरणातील दि. ७ एप्रिल रोजी दोन आरोपींना तुळजापूर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
सदर प्रकरणात सोरिजिन आर. ई.सर्विसेस प्रा.लि.कंपनीच्या पवनचक्कीचे पाते (ब्लेड) वाहतूक करणाऱ्या ट्रेलरला मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी अडवून चालकास शिवीगाळ करत गंभीर मारहाण केली. तसेच एक लाख रुपयांची खंडणी मागून फिर्यादीच्या खिशातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे.या घटनेनंतर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५९/२०२६ अंतर्गत कलम ३०९(२) व ३०८(२) बी.एन.एस. अन्वये दि. १ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली होती.दरम्यान, आरोपींच्या वतीने ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद करत आरोपींची बाजू भक्कमपणे मांडली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.
0
7
6
5
0
5



