ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
तुळजापूर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; अर्जछाननीनंतर निवडणूक मैदान तापले

0
7
6
4
9
7
तुळजापूर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; अर्जछाननीनंतर निवडणूक मैदान तापले

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी दि.२२ जानेवारी २०२६ रोजी पार पडताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्जछाननीनंतर तालुक्यातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाल्याने आता खरी लढाई सुरू होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
जिल्हा परिषदेच्या ९ गटांसाठी तब्बल १०२ उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले असून, पंचायत समितीच्या १८ गणांसाठी १४९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या आकड्यांवरूनच तुळजापूर तालुक्यातील निवडणूक किती चुरशीची होणार आहे, याचा अंदाज येतो.
अर्जमाघारीची अंतिम तारीख २७ जानेवारी २०२६ असून, त्या दिवसानंतरच अंतिम लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र अर्जछाननीच्या टप्प्यातच पक्षीय समीकरणे बदलत असल्याने राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक उमेदवार उभे केले असून, भाजप तालुक्यात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर यशवंत सेनेनेही मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरवत आपले स्वतंत्र अस्तित्व ठळक केले आहे.काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनीही आपापल्या ताकदीचे प्रदर्शन करत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे काही गटांत थेट पक्षीय लढतींसोबतच बंडखोर उमेदवारांमुळे रंगतदार मुकाबले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, रोजगार आणि स्थानिक नेतृत्व हे मुद्दे यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार असून, प्रत्येक पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.अर्जछाननीनंतरच तालुक्यातील चौकाचौकांत राजकीय चर्चांना उधाण आले असून, आता २७ जानेवारीनंतर नेमकी कोणाची ताकद कुठे आहे याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे. तुळजापूर तालुक्यातील ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची नसून, ती आगामी राजकीय समीकरणांची नांदी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
0
7
6
4
9
7



