Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वेमार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी – विकासाला मिळणार नवी गती!

सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वेमार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी – विकासाला मिळणार नवी गती!

0 7 6 5 0 5

सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वेमार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी – विकासाला मिळणार नवी गती!

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव आणि तुळजापूर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोलापूर–तुळजापूर–धाराशिव या बहुप्रतिक्षित रेल्वेमार्गाच्या ₹३२९५ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाने अखेर हिरवा कंदील दिला आहे.या रेल्वेमार्गामुळे केवळ उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार नाहीत, तर तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयींतही मोठी वाढ होणार आहे. धार्मिक पर्यटनाला मिळणारी चालना हा या प्रकल्पाचा एक मोठा लाभ ठरणार आहे.

 

राज्य सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण धाराशिवकरांत आणि तुळजापूरकरांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार, अशी प्रतिक्रिया तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील व युवा नेते विनोद गंगणे तसे स्थानिक नागरिक आणि जनप्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात येत आहे.धाराशिवच्या विकासाला रेल्वेची गती — स्वप्न आता वास्तवाच्या मार्गावर!

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे