गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
ब्रेकिंग न्यूज नगर परिषद निकालांना मोठा “ब्रेक”! मतमोजणी २१ डिसेंबरला; उमेदवारांची धाकधूक वाढली १९ दिवसांचे “वेटिंग”!
उमेदवारांची धाकधूक वाढली १९ दिवसांचे "वेटिंग"!

0
7
6
4
9
7
ब्रेकिंग न्यूज नगर परिषद निकालांना मोठा “ब्रेक”! मतमोजणी २१ डिसेंबरला
उमेदवारांची धाकधूक वाढली १९ दिवसांचे “वेटिंग”!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राज्यातील नगर परिषद निवडणुकांच्या निकालांवर “ब्रेक” नागपूर खंडपीठाच्या आदेशाने मतमोजणी २१ डिसेंबरला ढकलली! उमेदवारांची धाकधूक वाढली; १९ दिवसांची प्रतीक्षा अनिवार्य राज्यात आज दि.२ डिसेंबर रोजी विविध नगर परिषदांसाठी झालेल्या मतदानानंतर उद्या निकाल लागू, अशा उत्सुकतेत उमेदवार आणि मतदार बसलेले असतानाच, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाने निवडणूक प्रक्रियेत मोठी कलाटणी आली आहे. आता सर्वच नगर परिषदांची मतमोजणी थेट २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
▪️ नेमके प्रकरण काय?
राज्यातील काही नगर परिषदांच्या निवडणुका – बारामती, तळेगाव इत्यादी – उमेदवारी अर्जांची छाननी आणि कायदेशीर कोंडी यामुळे निवडणूक आयोगाने स्थगित केल्या होत्या. या ठिकाणी मतदान २० डिसेंबर रोजी आयोजित केले गेले आहे.
अशा परिस्थितीत आज झालेल्या निवडणुकांचे निकाल आधी लागल्यास, त्याचा थेट परिणाम २० डिसेंबरच्या मतदानावर होऊ शकतो, असे नमूद करून नागपूर खंडपीठाने सर्वच परिणाम एकत्रित जाहीर करण्याचा आदेश दिला आहे.
त्या अनुषंगाने, आज मतदान झालेल्या सर्व नगर परिषदांची मतमोजणी आता उद्याच नव्हे, तर एकाच दिवशी -२१ डिसेंबरला होणार आहे.
▪️ उमेदवारांची धाकधूक वाढली १९ दिवसांचे “वेटिंग”!
सहसा मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निकाल लागल्याने उमेदवारांवरील ताण कमी होतो. परंतु आता ईव्हीएम मशीन सील करून १९ दिवस स्ट्रॉन्ग रूममध्ये ठेवली जाणार असल्याने, उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
पुढील दोन आठवडे उमेदवारांना
– कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी,
– गणिते मांडणे,
– आणि विविध राजकीय समीकरणांवर चर्चा
यातच घालवावे लागणार आहेत.
▪️ महत्त्वाचे मुद्दे
मतदान दिनांक: २ डिसेंबर २०२५
नवीन मतमोजणी दिनांक: २१ डिसेंबर २०२५ न्यायालय: मुंबई उच्च न्यायालय,नागपूर खंडपीठ
मुख्य कारण: २० डिसेंबरला होणाऱ्या स्थगित निवडणुकांचा निकाल प्रभावित होऊ नये म्हणून सर्वांचे निकाल एकत्रित घोषित करणार
▪️प्रशासनाची कसरत वाढली
न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाला ईव्हीएम मशिन्सची सुरक्षा १९ दिवस कायम ठेवावी लागणार आहे. स्ट्रॉन्ग रूमच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार असून सुरक्षा दलांना सतत पहारा ठेवावा लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे संपूर्ण राज्यात निवडणूक प्रक्रियेची गती बदलली असून,आता सर्वांचे डोळे २१ डिसेंबरच्या ‘महादिवसा’कडे लागले आहेत.


0
7
6
4
9
7




