ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तुळजापूर हादरले;पण पोलिसांचा “आयरन हँड”-कुलदीप मगर हल्ला प्रकरणात अवघ्या काही तासांत पाच आरोपी गजाआड!
तुळजापूर हादरवणाऱ्या हल्ल्यावर पोलिसांचा वज्राघात; कुलदीप मगर प्रकरणात पाच आरोपी गजाआड

0
7
6
5
0
5
तुळजापूर हादरले;पण पोलिसांचा “आयरन हँड”-कुलदीप मगर हल्ला प्रकरणात अवघ्या काही तासांत पाच आरोपी गजाआड!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शहरात खळबळ उडवून देणाऱ्या कुलदीप मगर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करत अवघ्या काही तासांत पाच आरोपींना अटक करून कायदा हातात घेणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या ठाम आदेशानुसार विशेष पथक तत्काळ मैदानात उतरले आणि आरोपींची पळापळ थांबवली.या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांसह इतरांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून, कारवाईची धार अधिक तीव्र करण्यात आली आहे. हल्ल्याची माहिती मिळताच एकही क्षण दवडला न जाता तपासाला वेग देत चैतन शिंदे, शेखर गंगणे, नंदु गंगणे, अतुल दळवी आणि सोनू कदम या पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या.

शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठणकावून सांगितले की, तुळजापूरमध्ये गुन्हेगारीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही. विशेष पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि वेगवान हालचालींच्या आधारे ही कारवाई यशस्वी केली.

या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला असला, तरी पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, उर्वरित आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईने एकच संदेश दिला आहे.कायदा मोडणाऱ्यांना तुळजापूरमध्ये थारा नाही!
0
7
6
5
0
5



