Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तहसीलदारांच्या आदेशाला मंडळ अधिकाऱ्यांकडून केराची टोपली ?

भातंब्री येथील शेतरस्ता प्रकरण; आदेश असूनही रस्ता खुला होत नाही,आदेश असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

0 7 6 5 0 5

तहसीलदारांच्या आदेशाला मंडळ अधिकाऱ्यांकडून केराची टोपली ?

भातंब्री येथील शेतरस्ता प्रकरण; आदेश असूनही रस्ता खुला होत नाही,आदेश असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथील शेतरस्ता प्रकरणात तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. तहसीलदारांनी शेतरस्ता खुला करण्याचा स्पष्ट आदेश दिला असतानाही संबंधित मंडळ अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.रायखेल येथील शिवाजी गोरोबा दांगट यांनी गट क्रमांक ५३ व ५५ या शेतजमिनींसाठी जाण्या-येण्याचा रस्ता बंद केल्याची तक्रार २०१८ मध्ये तहसील कार्यालयात केली होती. त्यानंतर मंडळ अधिकारी व महसूल विभागाने पंचनामा करून नंबरी बांधावरून ८ फूट रुंदीचा शेतरस्ता खुला करण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन तहसीलदारांनी १० मार्च २०२३ रोजी आदेश देऊन रस्ता खुला करण्यास सांगितले होते.मात्र प्रतिवादी बाबासाहेब नारायण जाधव (रा. तीर्थ खु.) यांनी संबंधित रस्ता पुन्हा अडविल्याची तक्रार अर्जदाराने केली. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी महसूल अधिकारी प्रत्यक्ष जागेवर गेले असता तहसीलदारांच्या आदेशानुसार रस्ता खुला करण्यास विरोध करण्यात आला.यामुळे लोकसेवकांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी बाबासाहेब जाधव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मंडळ अधिकाऱ्यांना याबाबत पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, तहसीलदारांचा आदेश असूनही प्रत्यक्षात शेतरस्ता खुला न झाल्याने महसूल प्रशासनातील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे