Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ आणि रवींद्र इंगळे यांची तुळजापुरात खलबते

शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ आणि रवींद्र इंगळे यांची तुळजापुरात खलबते

0 7 6 4 9 6

शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ आणि रवींद्र इंगळे यांची तुळजापुरात खलबते

तुळजापूर – राज्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आणि प्रलंबित कर्जमाफीच्या मुद्द्यावर भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि प्रख्यात शेतकरी नेते रवींद्र इंगळे यांच्यात तुळजापूर येथे महत्त्वपूर्ण चर्चा संपन्न झाली. आई तुळजाभवानीच्या दर्शनानंतर दोन्ही नेत्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर दीर्घकाळ विचारविनिमय केला. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय आणि शेतकरी वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग आला असून, लवकरच एका मोठ्या राज्यव्यापी आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांची वाढती कर्जबाजारीपणा ची स्थिती, बँकांकडून होणारी वसुली आणि सरकारने जाहीर केलेल्या योजनांमधील त्रुटींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. “शेतकरी आज अडचणीत असताना सरकार केवळ आश्वासने देत आहे. आता केवळ चर्चा करून चालणार नाही, तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे,” असे मत यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले.या प्रसंगी काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल. रवींद्र इंगळे यांनीही शेतकरी संघटना आणि राजकीय शक्ती एकत्र आल्यास सरकारला नमवता येईल, असा विश्वास व्यक्त केला.येत्या काही दिवसांत या चर्चेचे रूपांतर एका राज्यव्यापी आंदोलनात होणार असून, त्याचे स्वरूप आणि तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तुळजापुरातील या भेटीने आगामी काळात सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहण्याचे संकेत मिळत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे