Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

धारूर येथे मिक्सर प्लॅन्टच्या प्रदूषणाने शेतकऱ्यांचा आक्रोश; प्रशासनाकडून दुर्लक्षाचा आरोप

धारूर येथे मिक्सर प्लॅन्टच्या प्रदूषणाने शेतकऱ्यांचा आक्रोश; प्रशासनाकडून दुर्लक्षाचा आरोप

0 7 6 4 9 7

धारूर येथे मिक्सर प्लॅन्टच्या प्रदूषणाने शेतकऱ्यांचा आक्रोश; प्रशासनाकडून दुर्लक्षाचा आरोप

धाराशिव : कळंब–तुळजापूर रस्त्याच्या कामासाठी धारूर परिसरात उभारण्यात आलेल्या सिमेंट खडी मिक्सर प्लॅन्ट व दगड खदाणीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील शेतकरी मोरेश्वर मुरलीधर कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.


कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गट नंबर १०९ मधील वडिलोपार्जित शेतीजवळ सुरू असलेल्या मिक्सर प्लॅन्टमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ व प्रदूषण निर्माण होत आहे. याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होत असून मागील दोन वर्षांत वार्षिक ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार अर्जात नमूद करण्यात आली आहे.
याशिवाय संबंधित ठेकेदाराने शेतजमिनीच्या दोन्ही बाजूंना खडी व बांधकाम साहित्य टाकून अडथळा निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ सहन करावा लागत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे.या गंभीर प्रकरणात प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रदूषण नियंत्रणाचे नियम पायदळी तुडवले जात असताना प्रशासन मात्र मौन बाळगत असल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे.दरम्यान, संबंधित मिक्सर प्लॅन्ट तात्काळ अन्यत्र हलवून ठेकेदारावर कडक कारवाई करावी, तसेच झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी अर्जदाराने केली आहे. आता प्रशासन या तक्रारीची कितपत दखल घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे