तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल; खासदार ओमराजे निंबाळकरांचा विरोधकांवर घणाघात — राजकारण जनतेसाठी, स्वतःसाठी नव्हे!
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल!
खासदार ओमराजे निंबाळकरांचा विरोधकांवर घणाघात — राजकारण जनतेसाठी, स्वतःसाठी नव्हे!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
सहा वर्षांनंतर तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील आणि माजी नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ऋषी मगर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत खासदार निंबाळकर यांनी विरोधकांवर घणाघाती टीका करत नगरपरिषद निवडणुकीचा सुर लावला.

◾“सत्ता आली की वसुली सुरू होते — ही बॉडी जनतेच्या हक्कावर डल्ला मारते!”खसदार ओमराजेंनी थेट विरोधकांना उद्देशून म्हटले,

◾निवडणुका लागल्या की कोट्यवधी रुपये खर्च करून सत्ता मिळवायची, आणि सत्ता आली की जनतेच्या हक्काच्या संपत्तीवर डल्ला मारून वसुली करायची, हीच पद्धत सध्याच्या नगरपरिषद बॉडीची झाली आहे.
◾ड्रग्ज विकणाऱ्या नव्हे, तर समाज घडवणाऱ्या उमेदवाराला निवडा ओमराजेंनी नागरिकांना आवाहन केले,
आपण निवडून देणारा प्रतिनिधी पैशांनी विकत घ्यायचा का, की पाच वर्ष जनतेसोबत काम करणारा निवडायचा? व्यसन लावणाऱ्या उमेदवाराला नाही, तर व्यसनमुक्त समाज घडवणाऱ्याला निवडा.
◾राजकारण आमच्या घराण्याची मक्तेदारी नाही खासदार निंबाळकर म्हणाले,
नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती-या निवडणुकीत स्वतःचा मुलगा, बायको उभी करण्याची आमची परंपरा नाही. राजकारण वारसा नाही, ते जनतेची सेवा आहे.”
◾शरद पवारांचा विश्वासघात केला!
“ज्या पक्षात ४० वर्षे सत्ता भोगली,कॅबिनेट मंत्रीपदे मिळवली, त्यांनी जनतेसाठी काय केलं? धाराशिव जिल्हा आज देशात मागासलेल्या जिल्ह्यांत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे कोणाचं अपयश आहे? असा थेट सवाल ओमराजेंनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरही निशाणा साधत आरोप केला,शरद पवारांच्या सत्तेचा राजकीय आसरा संपताच भाजपमध्ये जाऊन कोट्यवधी रुपये खर्च करून सत्तेत आले. हे जनतेसाठीचं राजकारण आहे का स्वतःसाठीचं? त्यांनी सांगावे
◾ऋषी मगरांचा शिवसेनेत स्वागत!
पत्रकार परिषदेत काँग्रेसचे आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ऋषिकेश मगर यांनी महायुती सरकारच्या सत्तेवर लाथ मारत शिवसेना (उबाटा ) गटात प्रवेश केला.त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी पक्षात स्वागत केले.तुळजापूरच्या जनतेचा विकास हा आमचा धर्म आहे. सत्ता जनतेसाठी, स्वतःसाठी नव्हे!
◾तुळजापूरकरांनी स्वतःच्या हातात नेतृत्व घ्यावे
तुळजापूर शहराने यावेळी बाहेरून येणाऱ्या सत्तेच्या दलालांवर विसंबू नये. आपल्याच शहरातील, स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवाराला निवडून द्या.उदाहरणार्थ जशी उमरगा विधानसभा मतदारसंघात जनतेने स्वच्छ प्रतिमा पाहून स्वामींना निवडून दिलं, तशीच भूमिका तुळजापूरने घ्यावी,असे आवाहन खासदार ओमराजेंनी केले.सत्ता विकत घेतली जाते, पण विश्वास कमावावा लागतो. तुळजापूरच्या जनतेचा विश्वास आमच्यासोबत आहे.-खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितले.यावेळी आमदार कैलास पाटील ,माजी नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर, शाम पवार ,सुधीर कदम ,माजी नगरसेवक राहुल खपले ,अर्जुन साळुंके,रोहित चव्हाण,सचिन अमृतराव, युवा नेते ऋषिकेश मगर,धनंजय मगर तसेच शिवसैनिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर घनघाव
तुळजापूर : रामदारा तलाव गेले दहा वर्षांपासून बांधून ठेवण्यात आला होता. मात्र घाटणी बॅरेजचे पाणी या रामदरा तलावात आणण्याचा प्राधान्यक्रम महाविकास आघाडी सरकारच्या काळात हटविण्यात आल्याने विकास कामे थांबली होती. आता रामदारा तलावास पाणी आणण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे.त्याची मंजुरी जीआर सर्वकाही खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे उपलब्ध आहेत “आभासी विकास नव्हे, तर प्रत्यक्ष विकास हवा,” असे सांगत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर घनघाव करत प्रायव्हेट मेडिकल हॉस्पिटल आम्ही मुंबई येथील नेरूळ येथे चालू केले नाही.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.



