शेतमाल विक्रीनंतर २४ तासांत पैसे घ्या बाजार समितीचा शेतकऱ्यांना सल्ला;शेतकऱ्यांनो जागरूक राहा! — व्यापाऱ्यांच्या भुलथापांना बळी पडू नका…
शेतमाल फक्त मार्केट यार्डमध्येच विक्री करा - सचिव उमेश बोफळे
शेतमाल फक्त मार्केट यार्डमध्येच विक्री करा – सचिव उमेश बोफळे
शेतमाल विक्रीनंतर २४ तासांत पैसे घ्या बाजार समितीचा शेतकऱ्यांना सल्ला;शेतकऱ्यांनो जागरूक राहा! — व्यापाऱ्यांच्या भुलथापांना बळी पडू नका…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
कृषि उत्पन्न बाजार समिती, तुळजापूर (श्री तुळजाभवानी मार्केट यार्ड, लातूर रोड, तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्या वतीने कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे विनम्र आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल फक्त बाजार समितीच्या आवारातच विक्री करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
१) शेतमालाची विक्री करताना फक्त परवानाधारक व्यापाऱ्यांनाच विक्री करावी.
२) शेतमाल विक्रीनंतर बाजार समितीच्या शिक्क्याची गुलाबी पावती घेणे अत्यावश्यक आहे. कोऱ्या पावत्यांना कोणताही कायदेशीर दर्जा नसल्याने तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ (उदा. भावफरक, अनुदान इ.) घेण्यासाठी पक्की पावती आवश्यक आहे.
३) व्यापाऱ्यांचा वजनकाटा प्रमाणित आहे का याची खात्री करूनच वजन घ्यावे.
४) शेतमाल विक्रीनंतर २४ तासांच्या आत पैसे मिळाले पाहिजेत.
५) जर व्यापाऱ्याने पैसे देण्यासाठी ७ दिवसांपेक्षा अधिक वेळ घेतला, तर त्वरित बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.
६) काही व्यापारी जास्त भावाचे आमिष दाखवून (उदा. चेक देणे, ६ महिन्यांनंतर रक्कम देणे इ.) शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अशा भुलथापांना बळी पडू नका.
बाजार समितीकडे वारंवार शेतमाल विक्री व रक्कम अडकण्यासंदर्भातील तक्रारी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहून वरील सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. जर रक्कम मिळण्यात विलंब झाला, तर शेतमाल विक्रीची पक्की पावती घेऊन समिती कार्यालयात तक्रार दाखल करावी. संबंधित व्यापाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल,असे स्पष्ट आव्हाण करण्यात आले आहे.



