Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पवण उर्जा प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर दबाव? ‘सेरेनिका रिन्यूएबल्स’विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

पवण ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर दबाव? ‘सेरेनिका रिन्यूएबल्स’विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

0 7 6 4 9 6

पवण ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर दबाव?
‘सेरेनिका रिन्यूएबल्स’विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील जमिनीच्या वादप्रकरणी पवण ऊर्जा प्रकल्प उभारणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कथित त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे.

संबंधित प्रकरणात ‘सेरेनिका रिन्यूएबल्स इंडिया प्रा. लि.’ या कंपनीच्या कामकाजाची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.निवेदनानुसार, तुळजापूर येथील गट क्रमांक 284 व 285 मधील सुमारे 400 एकर जमिनीवर पवण ऊर्जा प्रकल्प उभारणीच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, संबंधित जमिनीवर विनापरवानगी प्रवेश करून मोजमाप व इतर कामे केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या मालकी हक्कांवर गदा येत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.यापूर्वीच शेतकरी रेणुका राजेश राठोड व रुक्मिणबाई निलाप्पा राठोड यांनी 29 सप्टेंबर 2025 रोजी प्रशासनाकडे तक्रार अर्ज सादर केला होता. त्यानंतर तुळजापूर न्यायालयात दिवाणी दावा क्र. 556/2025 दाखल करण्यात आला असून प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. तसेच 16 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.दरम्यान, 13 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालयाकडून गाव तलाठीमार्फत व्हॉट्सॲपद्वारे सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले असून 18 मार्च रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती.

मात्र, सुनावणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत असून मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच 15 व 16 मार्च 2026 रोजी कंपनी प्रतिनिधींनी संबंधित जमिनीवर जाऊन मोजमाप करण्याचा प्रयत्न केल्याने महिला शेतकऱ्यांशी वाद निर्माण झाल्याचा तसेच दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत प्रशासनाला माहिती देऊनही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली.प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना कोणतीही जबरदस्तीची कारवाई तात्काळ थांबवावी, संबंधित कंपनीच्या हालचालींची चौकशी करावी, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त पाहणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, रुक्मिणबाई राठोड व रेणुका राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे