Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

धाराशिव जिल्ह्यात भाजप अव्वल; महायुतीला ५५ पैकी ३९ जागांवर घवघवीत यश

धाराशिव जिल्ह्यात भाजप अव्वल; महायुतीला ५५ पैकी ३९ जागांवर घवघवीत यश

0 7 6 4 9 6

धाराशिव जिल्ह्यात भाजप अव्वल; महायुतीला ५५ पैकी ३९ जागांवर घवघवीत यश

धाराशिव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. महायुतीला मतदारांनी स्पष्ट व निर्विवाद कौल देत ५५ पैकी तब्बल ३९ जागांवर घवघवीत यश मिळवून दिले. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे प्रचारात प्रत्यक्ष सक्रिय नसले, तरी त्यांनी आखलेली रणनीती मात्र अचूक ठरली. त्यांच्या नियोजनबद्ध डावपेचांचा फायदा महायुतीला मिळाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. धाराशिव आणि तुळजापूर पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून, अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
दरम्यान, या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाला मोठा धक्का बसला आहे. खासदार राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मतदारांनी स्पष्ट नकार दिल्याने त्यांच्या जागांची संख्या एक अंकीवर मर्यादित राहिली आहे.विशेष म्हणजे, आमदार कैलास पाटील यांच्या सारोळा गावातच भाजप उमेदवाराला तब्बल ८०० मतांचे मताधिक्य मिळाले. हा निकाल उबाठा गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकूणच धाराशिव जिल्ह्यात महायुतीने निर्णायक मुसंडी मारत राजकीय चित्र पूर्णपणे आपल्या बाजूने वळवले आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे