ब्रेकिंगमहाराष्ट्र
धाराशिव जिल्हा परिषदवर महायुतीचा “झेंडा”; भाजपच्या सौ.अर्चनाताई पाटील अध्यक्षा तर सौ.उषाताई गायकवाड उपाध्यक्ष
धाराशिव जिल्हा परिषदवर महायुतीचा "झेंडा"; भाजपच्या सौ.अर्चनाताई पाटील अध्यक्षा तर सौ.उषाताई गायकवाड उपाध्यक्ष

0
7
6
5
0
0
धाराशिव जिल्हा परिषदवर महायुतीचा “झेंडा”; भाजपच्या सौ.अर्चनाताई पाटील अध्यक्षा तर सौ.उषाताई गायकवाड उपाध्यक्ष
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी महायुतीच्या सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांची निवड झाली. जिल्हा परिषदेत दि.१३ मार्च २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या निवड प्रक्रियेत ५५ पैकी तब्बल ४५ मते मिळवत महायुतीने दणदणीत विजय नोंदविला.या निवडीमुळे धाराशिव जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपला अध्यक्षपद मिळाल्याने हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे. महायुतीच्या एकजुटीचा, विकासाभिमुख धोरणांचा आणि जिल्ह्यातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.निवडीनंतर अनेक मान्यवरांनी नूतन अध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील व उपाध्यक्ष सौ. उषाताई गायकवाड यांची भेट घेऊन अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य व विविध विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्यासह महायुतीतील विविध नेते व पदाधिकाऱ्यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तसेच माजी आमदार राजन साळवी, ज्ञानराज चौगुले, बसवराज पाटील, राहुल मोटे, सुजितसिंह ठाकूर, सुरेश बिराजदार, सुनील चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, रिपाईचे राजाभाऊ ओव्हाळ, संताजी चालुक्य, अभय चालुक्य व राहुल पाटील सास्तुकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.दरम्यान, नूतन अध्यक्ष अर्चनाताई पाटील या माजी मंत्री राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी असून उपाध्यक्ष उषाताई गायकवाड या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0
7
6
5
0
0



