Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

धाराशिव काँग्रेसला नवे नेतृत्व; पण पक्षाला लागलेली गळती थांबणार का?

धाराशिव काँग्रेसला नवे नेतृत्व; पण पक्षाला लागलेली गळती थांबणार का?

0 7 6 4 9 7

धाराशिव काँग्रेसला नवे नेतृत्व; पण पक्षाला लागलेली गळती थांबणार का?

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उमेशराजे निंबाळकर यांचा धाराशिव येथील कॉंग्रेस भवनात सत्कार करण्यात आला. मावळते जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विश्वास शिंदे, राजाभाऊ शेरखाने, नगरसेवक अमोल कुतवळ, खालील शेख, प्रशांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान,उमेशराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटना पुन्हा उभी राहील,असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असला तरी जिल्ह्यातील काँग्रेसची सध्याची अवस्था चिंताजनक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सक्रिय राजकारणात असताना धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसचा दबदबा होता. प्रशासनावर पक्षाची पकड होती. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना डावलल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून अलिप्त भूमिका घेतली आणि त्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसची मोठी पडझड सुरू झाल्याचे चित्र दिसून आले.पक्षाने नवख्या नेतृत्वाला संधी देत धीरज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. उलट भाजप आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना अप्रत्यक्ष बळकटी मिळाल्याची चर्चा आता उघडपणे होत आहे. जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी पक्षासाठी कमी आणि इतर नेत्यांसाठी अधिक सक्रिय असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांतून होत आहे.दरम्यान, काँग्रेसमधील नाराजी आता राजीनामा सत्रातून समोर येऊ लागली आहे. काँग्रेसचे धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. अधिकृतरीत्या वैयक्तिक कारण सांगितले जात असले तरी जिल्ह्यात “काँग्रेस भाजपच्या दावणीला बांधली गेली आहे” अशी जोरदार चर्चा रंगली आहे.यामुळे नव्या जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांच्यासमोर संघटन पुन्हा उभे करणे, नाराज कार्यकर्त्यांना थांबवणे आणि काँग्रेसला नवसंजीवनी देणे हे मोठे आव्हान असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे