Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

ॲड व्यंकटराव गुंड यांचा सरकारवर घरचा आहेर ! उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल शेतकऱ्यांच्या मनात विष पेरू नका. आम्ही मूग गिळून गप्प बसणारे नाही -ॲड विशाल साखरे

ॲड व्यंकटराव गुंड यांचा सरकारवर घरचा आहेर !

0 7 6 5 0 5

ॲड व्यंकटराव गुंड यांचा सरकारवर घरचा आहेर !

उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल शेतकऱ्यांच्या मनात विष पेरू नका. आम्ही मूग गिळून गप्प बसणारे नाही -ॲड विशाल साखरे

धाराशिव : प्रतिनिधी 

 

उसाच्या हंगामाला सुरुवात झाली असताना यंदा ऊसाला २,४०० रुपये प्रतिटन भाव देण्याचा गुळ पावडर उत्पादक कारखान्यांचा प्रस्ताव असतानाही शेतकऱ्यांकडून ऊस विक्रीस नकार देण्यात येत आहे.गुळ पावडर उत्पादक कारखाने अडचणीत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे परिस्थिती गंभीर बनली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.गुळ पावडर उत्पादक कारखाना संघटनेचे अध्यक्ष तसेच भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. व्यंकटराव गुंड यांनी सांगितले की,

◾डीसलरी व इथेनॉल उत्पादनाची परवानगी मिळत नसल्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना अधिक भाव देणे शक्य होत नाही. परवानगी मिळाल्यास आम्ही कारखान्यांपेक्षा जास्त भाव देऊ शकतो.संघटनेचा आरोप आहे की, अजित पवार आणि शुगर लॉबी मुद्दाम निर्णय घेऊ देत नाहीत.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विभागात आमच्या फाइल्स प्रलंबित आहेत. त्या पुढे नेण्याऐवजी त्यावर अडथळे आणले जात आहेत, असेही संघटनेकडून सांगण्यात आले.

◾अजित पवार यांच्याकडे स्वतःचे कारखाने असल्याने गुळ पावडर उत्पादकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पर्यायी उद्योगांना चालना मिळत नाही,”
असा आरोप व्यंकटराव गुंड यांनी केला.

दरम्यान, गुळ पावडर उत्पादक कारखान्यांनी सांगितले की,कारखाना टिकवण्यासाठी आम्ही यावर्षी कमी भाव दिला आहे. मात्र सरकारने इथेनॉल निर्मितीस परवानगी दिली तर ऊसाला अधिक दर देण्याची हमी आम्ही देतो.शेतकऱ्यांनी मात्र ऊस विक्रीवर ठाम भूमिका घेतली आहे.आम्हाला योग्य भाव मिळाल्याशिवाय ऊस देणार नाही,असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.गुळ पावडर उत्पादक कारखाना संघटनेने ऊसाला २,४०० रुपये भाव देण्याची मागणी कायम ठेवत सरकारकडे लवकर निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

 

जिल्हा प्रवक्ते ॲड.विशाल साखरे यांचे सडेतोड प्रतिउत्तर – आपण सत्तेत आहात,तरी सरकारलाच झोडपता ?

उसाला भाव, शेतकऱ्यांची स्थिती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून जिल्हा राजकारण तापले आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.व्यंकटराव गुंड यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागत म्हटले की शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव दिला जात नाही, सरकार अडकाटे करते.

या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हा प्रवक्ते ॲड.विशाल साखरे यांनी जोरदार पलटवार केला. त्यांनी गुंड यांना थेट सल्ला देत म्हणाले आपण सत्तेत आहात, सरकारलाच जागे करण्याची भाषा योग्य नाही. हे सरकार आपलेच आहे,आणि त्यावरच टीका करणे म्हणजे स्वतःवरच वार करणे.ॲड. साखरे पुढे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांविषयी बेताल वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे. आपण एवढे सक्षम नेते नाही की त्यांच्यावर बोलावे. आपल्या वक्तव्यावर नियंत्रण ठेवावे. असा

इशाराही दिला की – अजित पवार यांच्या बद्दल शेतकऱ्यांच्या मनात विष पेरू नका. आम्ही मूग गिळून गप्प बसणारे नाही. सरकार महायुतीचे आहे,हे विसरू नका! दरम्यान, व्यंकटराव गुंड यांच्या वक्तव्यामुळे जिल्हा भाजप आणि राष्ट्रवादी गटांमध्ये वादळ उठले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.राजकारणात घरचा आहेर देणारे ॲड व्यकंटराव गुंड आता आपल्या वक्तव्यावरच सापडले आहेत – आणि विरोधकांनी दिले आहे सडेतोड प्रतिआहेर!

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे