Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

खून हल्ला प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता

धारदार शस्त्राने पोटात वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा होता आरोप

0 7 6 5 0 5

खून हल्ला प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता

धारदार शस्त्राने पोटात वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा होता आरोप

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

चिकुंद्रा गावातून वाढदिवसाच्या निमित्ताने फिर्यादीस सोलापूर तालुक्यातील नान्नज गावाजवळ नेऊन धारदार शस्त्राने पोटात वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या खून हल्ला प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.ठुबे साहेब यांच्या न्यायालयात चालवण्यात आला.चिकुंद्रा गावातील रहिवासी वामन भीमराव गरड यांना दि. १७/०६/२०१९ रोजी आरोपी चंद्रकांत गायकवाड, भाग्यवान गायकवाड व दीपक लोंढे यांनी चंद्रकांत गायकवाड याचा वाढदिवस असल्याचे कारण सांगून सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे गाडी सोडण्यासाठी नेले. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास चाकूने पोटात वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ३६७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, घटनास्थळ पंच, कपडे जप्ती पंच, हत्यार रिकव्हरी पंच, डॉक्टर, पोलीस पाटील, फॉरेन्सिक पुरावा तसेच तपासिक अधिकारी यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे सर्व साक्षीदार आपल्या जबाबावर ठाम राहिले व एकही साक्षीदार सरकार पक्षास फितूर झाला नाही. तरीही आरोपींच्या वतीने फौजदारी क्षेत्रातील नामांकित वकील ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी सर्व साक्षीदारांचा कसून उलट तपास करून प्रभावी बचाव मांडला.
प्रकरणातील महत्त्वाच्या बाबींमध्ये, फिर्यादीने कथन केलेल्या घटनेत संशय असल्याचा मुद्दा ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी ठळकपणे उपस्थित केला. तसेच ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आरोपी चंद्रकांत गायकवाड याचा वाढदिवसच नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. पूर्ववैमनस्यातून, म्हणजेच फिर्यादीच्या वडिलांनी यापूर्वी आरोपी क्रमांक १ यांच्या नातेवाईकाचा खून केल्याच्या प्रकरणात साक्ष दिल्याने त्यांना शिक्षा झाली होती. त्या रागातून खोटी घटना दाखवून आरोपीला गोवण्यात आल्याचा बचाव करण्यात आला.
तसेच फिर्यादीच्या पोलिसांपुढील जबाब, न्यायालयातील जबाब व कलम १६४ क्रि.प्र.सं. मधील जबाब यामध्ये परस्परविरोधी कथन असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. जखमी अवस्थेत फिर्यादी एका गावात पोहोचल्यानंतर तेथे पोलीस पाटील यांना माहिती दिली व त्यांनी त्यास सोलापूर येथे दवाखान्यात दाखल केले. मात्र सदर पोलीस पाटील यांचा जबाब तब्बल दीड महिन्यानंतर घेतल्याने त्यांच्या साक्षीवर संशय निर्माण करण्यात आला. तसेच पोलिस तपासात गंभीर त्रुटी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.मेडिकल व फॉरेन्सिक पुराव्यांबाबतही ॲड. विशाल साखरे यांनी कसून उलट तपास केला. डॉक्टरांनी सादर केलेल्या हत्यार अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हत्यारावर रक्ताचे डाग नसतानाही अहवाल सादर केल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तसेच फिर्यादीच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर पोलिसांनी कपड्यांवर व हत्यारावर रक्त लावून खोटा पुरावा तयार करण्याचा प्रयत्न केला असल्याचा मुद्दा उपस्थित करून फॉरेन्सिक प्रयोगशाळेत मुद्देमाल केव्हा जमा करण्यात आला, याबाबत संशय निर्माण केला.फिर्यादीच्या जबाबातील तफावत, पूर्वदुश्मनी, तपासातील त्रुटी, घटनास्थळ गावाबाहेर व अंधारात असणे, तसेच पुराव्यातील छेडछाड या सर्व बाबी न्यायालयात प्रभावीपणे मांडण्यात आल्या. तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे दाखले देत आरोपींना खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आणि गुन्हा सिद्ध होण्यासाठी सबळ पुरावा नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.हे सर्व युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ठुबे साहेब यांनी तिन्ही आरोपींना खुनाच्या प्रयत्नाच्या खटल्यातून निर्दोष मुक्त केले. विशेष म्हणजे, सरकार पक्षाचा एकही साक्षीदार फितूर नसतानाही, बचाव पक्षाने घेतलेला प्रभावी उलट तपास व मांडलेला सक्षम बचाव निर्णायक ठरला.या प्रकरणात आरोपी क्रमांक १ व ३ यांच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. मंजुषा विशाल साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. संकेत गोरे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. अमित गोळे,ॲड. ओंकार कोरेगावकर,ॲड. रोहित लोमटे, ॲड,महेश पवार,ॲड पृथ्वीराज खोचरे आदींनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे